शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन नवजात तर दोन उपजत बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज

डागातील घटना : नातेवाईकांमध्ये रोषनागपूर : बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी शासन एका जिल्ह्यावर कोट्यवधी रु पये दरवर्षी खर्च करीत असले तरी बालमृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आज रविवारी दोन नवजात तर दोन उपजत (गर्भातच) बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने बाळांचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.प्रसुतीदरम्यान बालमृत्यू व माता मृत्यू होऊ नये यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा अनेक योजना अमलात आणल्या आहेत. महिलांची प्रसुती आरोग्य संस्थेतच करावी यासाठी जनजागृतीवरही लाखो रुपये खर्च केले जात आहे. गर्भवती महिलाही सुरुवातीपासून शासकीय रुग्णालयांमधून तपासण्या करून घेत आहेत, तरी देखील बालमृत्यू थांबविण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे आजच्या प्रकरणातून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे डागा रुग्णालयात महिन्याचा बालमृत्यूचा दर ६ ते ८ टक्के एवढा आहे. यात उपजत नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती आहे. डागा रुग्णालयात सध्याच्या स्थितीत १७५ रुग्ण भरती आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी लागोपाठ दोन नवजात शिशू दगावले. यातील एकाचे वजन १.६ तर दुसऱ्याचे वजन १.७ एवढे होते. शिशूचे वजन कमी असल्याने ते दगावल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. ही घटना शांत होत नाही तोच दोन गर्भवती महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. इतर गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मृत बाळांच्या काही नातेवाईकांनी यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप लावला आहे तर काहींनी, सुरुवातीपासून याच रुग्णालयातून उपचार घेत असताना ही वेळ आलीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)