शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन खून; अनैतिक संबंधांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:05 IST

नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.

ठळक मुद्देतलवार व चाकू हल्ला करून केले ठारपत्नीने केली दाखल नवऱ्याविरुद्ध तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.नंदनवनमधील पडोळेनगरात आकाश देशभ्रतार राहतो. त्याचा नातेवाईक रवी पावस्कर (वय २२) हा भरतावाडा, पारडी येथे राहत होता. त्याचे आकाशच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे आकाशच्या मनात भलताच संशय निर्माण झाला होता. रवीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाल्याने आकाशने त्याचा मित्र आकाश मंडल (वय २८, रा. जयभीम चौक) याच्याशी संगनमत करून पावस्करच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार, गुरुवारी रात्री १०.४५ वाजता त्याला घरी बोलविले आणि तलवार तसेच चाकूचे घाव घालून पावस्करचा खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या प्रकरणात आरोपी आकाश देशभ्रतार आणि आकाश मंडल याच्याविरुद्ध देशभ्रतारची पत्नी खूशबू हिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून मध्यरात्री नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.खुनाची दुसरी घटना शुक्रवारी सकाळी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकेनगरात उघडकीस आली. मृतकाचा दोन आरोपीने दगडाने ठेचून निर्घृन खून केला. मृताची ओळख पटली नाही मात्र दोन संशयितांची नावे उघड झाली असून, दुपारी १२.३० पर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दारूच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय अजनी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Murderखून