शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
3
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
4
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
5
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
6
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
7
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
8
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
9
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
10
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
11
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
12
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
15
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
16
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब
18
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
19
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
20
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी

आणखी दोन आरोपी गजाआड

By admin | Updated: June 29, 2015 03:18 IST

मोहित मार्टिन पीटर (वय २३) या बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरच्या हत्याकांडातील आरोपींसोबत बिल्डरचे कनेक्शन उजेडात आल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे ...

मोहित पीटर हत्याकांड : सूत्रधाराचे पाठीराखे सक्रिय नागपूर : मोहित मार्टिन पीटर (वय २३) या बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टरच्या हत्याकांडातील आरोपींसोबत बिल्डरचे कनेक्शन उजेडात आल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित करताच सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे बिल्डरच्या पाठीराख्यांनी त्याच्या बचावासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सागर ऊर्फ फ्रँक अ‍ॅन्थोनी (वय २०) आणि दीपक ऊर्फ अँगल फ्रान्सिस अलेक्झांडर (वय २४) या दोन गुंडांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास उपरोक्त आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी मोहितच्या डोळ्यात तिखट फेकून त्याची निर्घृण हत्या केली होती. कोयता, तलवारीचे घाव करून मारेकऱ्यांनी मोहितला जागीच संपवले. तर मिखिल मायकल फ्रान्सिस (वय १८) याच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याला मागे ओढून जबर जखमी केले. आरोपींनी पळून जाताना या दोघांच्या गळ्यातील दोन लाखांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. या प्रकरणी गुन्हे शाखा आणि गिट्टीखदान पोलिसांनी धावपळ करून काही तासातच मॅडी ऊर्फ आशिष राठोड, तंबी ऊर्फ जेम्स बबलू गॅब्रियल, ब्रायन बेस्ट्रीयन ऊर्फ इब्राहिम अण्णा पलटी ऊर्फ सचिन गॅब्रियल आणि पापा ऊर्फ राजेंद्र जयराम साळवे या पाच आरोपींना अटक केली.तर, रविवारी दुपारी सागर ऊर्फ फ्रँक तसेच दीपक ऊर्फ अँगल या अजनीतील दोन गुंडांना अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे. आरोपींकडून एक स्कूटर तसेच तलवार आणि कोयताही जप्त करण्यात आला होता. ही स्कूटर आरोपी सागरची आहे. तसेच मोहितवर अन्य आरोपींसोबतच या दोघांनीही घाव घातल्याची कबुली दिली आहे.(प्रतिनिधी)आरोपीने पिटला डांगोरा दरम्यान, पहिल्या दिवशी अटक केलेल्या पाचपैकी एका आरोपीने प्राथमिक तपासातच वादग्रस्त बिल्डरच्या नावाचा ‘डांगोरा’ पिटला. त्यानंतर कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्येही उपरोक्त गुन्हेगारांच्या ‘महाराज’ संपर्कात असल्याचे उघड झाले. लोकमतने शनिवारी ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलिसांच्या तपासाची सुई बिल्डरच्या दिशेनेही वळली आहे. बिल्डरनेच मॅडीमार्फत सुपारी देऊन मोहितचा गेम केल्याची चर्चा आहे. बिल्डर आधीपासूनच आरोपींच्या संपर्कात होता. मात्र, सुपारी दिल्याचे उघड होणार नाही, अशी खात्री आरोपींना होती. बिल्डरची फिल्डिंगतंबी आणि ब्रायनमधील वादातून मोहितची हत्या झाल्याचे चित्र निर्माण करू, फार तर मॅडीला अटक होईल, आपले नाव पुढे येणार नाही. सुपारी किलिंगचाही उलगडा होणार नाही, अशी खात्री आरोपींना होती. मात्र आता पोलिसांची आपल्याकडे नजर वळल्याचे लक्षात येताच वादग्रस्त बिल्डरनेही बचावासाठी धावपळ सुरू केली आहे. पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी बिल्डरने आपल्या पाठीराख्यांमार्फत जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांनी काहींशी संपर्क करून पोलिसांनी बिल्डरला ‘मामा’ बनवू नये, यासाठीही बोलणी केली आहे. एका वादग्रस्त पोलिसाने बिल्डरला ‘मामा’ बनवणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे बिल्डरचे पाठीराखे आश्वस्त आहेत. दुसरीकडे बिल्डरच्या विरुद्ध पोलीस कधी कारवाई करतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.