शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

नागपूर : मेयो, मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरांचा संप शनिवारी मिटत नाही तोच मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांची ...

नागपूर : मेयो, मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरांचा संप शनिवारी मिटत नाही तोच मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने संपाचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात फळ विकत घेण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांशी इंडिगो कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमांनी वाद घालून मारहाण केली. या प्रकरणाच्या विरोधात ‘मार्ड’ने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रमजान महिना सुरू असल्याने दोन निवासी डॉक्टरांचे उपवास (रोजे) सुरू आहेत. फळ विकत घेण्यासाठी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान मेडिकल चौकात आले. हातठेल्यावरील फळ विकत घेऊन दुचाकीवर बसत असताना एका अज्ञात इसमाला चुकून पाय लागला. डॉक्टरांनी माफीसुद्धा मागितली. परंतु त्या इसमासोबत असलेल्या दोघांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एकाने दुचाकीची चावी काढली. डॉक्टरांनी स्वत:ची ओळख देत उपवास सुरू असल्याचेही सांगितले. परंतु त्या इसमाने आणखी दोघांना बोलविले. त्यांच्या हातात दगड होते. त्याचवेळी त्या अज्ञात इसमाने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने लोक जमा होताच मारहाण करणारे ‘एमएच ३१ डीसी ५६३३’ या क्रमांकाच्या इंडिगो कारमधून पळून गेले. याची माहिती इतर निवासी डॉक्टरांना मिळताच मेडिकलचे १०० वर डॉक्टर मेडिकल चौकात जमा झाले. जखमी डॉक्टरांना मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल केले. मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बन्सल यांच्या नेतृत्वात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. बन्सल म्हणाले, रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास आम्ही कामबंद आंदोलन करू.