शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

दोन दिवे, एका पंख्याचे वीजबिल आले १८ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:29 IST

Nagpur News वीजबिल थकबाकीमुळे विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू आहे. दुसरीकडे नियमित बिल भरणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांना भरमसाट बिल पाठविण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

ठळक मुद्देमौदा तालुक्यातील मारोडी येथील वास्तव

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर  : वीजबिल थकबाकीमुळे विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू आहे. दुसरीकडे नियमित बिल भरणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांना भरमसाट बिल पाठविण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

मारोती मस्के यांचे मारोडी (ता. मौदा) येथे वडिलोपार्जित कौलारू घर आहे. मस्के कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या राहत्या घरी दोन लाइट आणि एक पंखा एवढीच विद्युत उपकरणे आहेत. असे असतानाही त्यांना एक महिन्याचे वीजबिल १८ हजार रुपये आले आहे. हे बिल चुकीचे असल्याने त्यांनी बोरगाव (ता. मौदा) येथील महावितरण कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. मात्र कुणीही त्यांची दखल घेतली नाही. आपण नियमित बिल भरत असतानासुद्धा एवढ्या मोठ्या रकमेचे बिल का देण्यात आले, असा प्रश्न कुटुंबातील सदस्यांना पडला आहे.

महावितरणच्या वतीने ग्रामीण भागात घरगुती मीटरचे रिडिंग योग्य प्रकारे आणि दर महिन्याला घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अंदाजे वीजबिल पाठविले जात असल्याचा आरोप मारोडीचे सरपंच नीलकंठ भोयर यांनी केला आहे. त्यांनी मस्के यांचे वीजबिल कमी करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सहायक अभियंता अविनाश तांडेकर यांना विचारणा केली असता या प्रकरणात लक्ष घालतो, असे सांगितले.

टॅग्स :electricityवीज