शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी; वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 14:21 IST

Nagpur News विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्दे मुलांचे कपडे गावातील नाल्या शेजारी आढळले 

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :नागपूर: विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. रविवारपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याने त्यांचा सर्वदूर शोध सुरू होता. मात्र त्या शोधाची अखेर अशी विदारक झाली.

 आरुशी नामदेव राऊत (11) आणि अभिषेक नामदेव राऊत (8) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना नाल्याजवळील खड्ड्यात गेली असावी व तेथे अपघाताने पडली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरातील राज पांडे या 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून  हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथील दोन बहीण-भावाचे कपडे आणि चप्पल गावातील नाल्याशेजारी आढळल्याने सकाळी खळबळ उडाली होती.  ही मुले रविवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलांच्या आईने हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. रात्रभर या मुलांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही मिळाले नव्हते. सकाळी हिंगणा पोलिसांचे पथक सावंगी देवळी येथे दाखल झाल्यानंतर मुलांचा नाल्यातील खड्यात सुरु केला. येथील गाळात मुलांचे मृतदेह अडकलेले आढळले. आई कामावर गेल्याने ही मुले सकाळी घरीच होती. दुपारी खेळासाठी ती बाहेर गेली असावी असे सांगितले जात आहे.दोन्ही मृतदेह हिंगणा पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहेत. पोलीस इतर बाजूनेही तपास करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण