शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन तुरुंगाधिकारी निलंबित

By admin | Updated: April 3, 2015 01:40 IST

खतरनाक कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहातील दोन

नागपूर : खतरनाक कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहातील दोन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आर. जी. पारेकर आणि एस. यू. महाशिखरे अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईमुळे लोकमतने प्रकाशित केलेल्या ‘कैदी पलायन प्रकरणात फिक्सिंग’ च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या कालावधीत बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश), शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (वय २४, रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादुर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री (वय २४, रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कारागृहातील बराकीचे लोखंडी गज कापून कैदी पळून गेल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी मंगळवारी दुपारीच कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना तडकाफडकी निलंबित केले तर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेगवेगळी पथके आणि दस्तुरखुद्द अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर नागपुरात आल्या. दरम्यान, लोकमतने आज कारागृहातील कैदी प्रकरणात अधिकाऱ्यांचे फिक्सिंग असल्याचे वृत्त ठळकपणे छापले. घटनेच्या रात्री पारेकरची नाईट सर्चिंग होती,असाही त्यात उल्लेख केला. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. बोरवणकर यांनी कसून तपासणी केल्यानंतर पारेकर आणि महाशिखरे कैदी पलायन प्रकरणात दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बोरवणकर यांनी आज सायंकाळी तुरुंगाधिकारी पारेकर आणि महाशिखरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या संदर्भात लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निलंबनाच्या आदेशाला दुजोरा दिला. मात्र, अधिक बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)लोकमत वृत्ताचीएसीबीकडून दखलनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील भ्रष्टाचाराच्या लोकमत वृत्ताची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी या विभागाला चौकशीचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच एसीबीने गुरुवारपासून चौकशी प्रारंभ केली आहे. लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारावर ही चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पाच कच्च्या कैद्यांच्या पलायनास कारणीभूत ठरलेल्या कारागृहातील भ्रष्टाचाराची एका हितचिंतकाने लोकमतला फोन करून इत्थंभूत माहिती दिली. लोकमतने त्याचे मनोगत ठळकपणे २ एप्रिलच्या हॅलो नागपूरमध्ये प्रसिद्ध करून कारागृहात बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.