शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपूर एअरपोर्ट टर्मिनल बिल्डींगमध्ये मिळाले दोन बॉम्ब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी टर्मिनल बिल्डींग खाली केली. किमान दोन तास बॉम्बचा शोध घेतल्यानंतर दोन बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले. सुरक्षा दलाची ही सर्व कसरत मॉकड्रीलची होती.

ठळक मुद्देमॉकड्रीलदरम्यान प्रवाशांना काढले बाहेर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी टर्मिनल बिल्डींग खाली केली. किमान दोन तास बॉम्बचा शोध घेतल्यानंतर दोन बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले. सुरक्षा दलाची ही सर्व कसरत मॉकड्रीलची होती.या अभ्यासादरम्यान इंडिगो एअरलाईन्समधून एक फोन कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी स्वत:ला जम्मू काश्मीर येथील सांगून कलम ३७० हटविल्यामुळे व जनतेला कैदेत ठेवल्याबद्दल रोष व्यक्त करीत टर्मिनल बिल्डींगच्या येणाऱ्या आणि जाणाºया गेटजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. घटनेची सूचना मिळताच बैठक बोलावण्यात आली. यात कार्यवाहीची दिशा ठरविण्याबरोबरच संबंधित एजन्सीला सूचनाही करण्यात आली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळावर ही मॉकड्रील करण्यात आली. पोलिसांचे वाहन पोहचले. अ‍ॅम्ब्युलन्सचे सायरन विमानतळावर वाजायला लागले. व्यवस्थापनाने सूचना देत प्रवाशांना बाहेर काढले. बॉम्बची सूचना मिळताच तीन प्रवासी (बनावट) बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. एअरलाईन्स, मिहान इंडिया लि. सह अन्य एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व पोलिसांचे डॉग स्क्वॉड व बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे बॉम्बचा तपास सुरू केला. दरम्यान दोन क्विक रिस्पॉन्स टीम, अग्निशमन विभागाचे फायर टेंडर सुद्धा उपस्थित झाले. ही मॉकड्रील विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट विन्सेंट यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी एअरपोर्ट डायरेक्टर विजय मुळेकर तसेच अन्य एजन्सीचे अधिकारी उपस्थित होते. किमान दीड तास मॉकड्रील चालल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी समीक्षा बैठक घेऊन त्रुटींवर चर्चाही केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर