लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने अडीच वर्षाच्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी बुधवारी हा निर्णय दिला.विचेत संभाजी वाघमारे (२२) असे आरोपीचे नाव असून तो एमआयडीसी, बुटीबोरी येथील रहिवासी आहे. मयत बालकाचे नाव अथर्व श्रीरामे होते. तो आरोपीच्याच वस्तीत राहात होता. आरोपी हा वस्तीतील लोकांसोबत नेहमीच वाद घालत होता. ३ मार्च २०१७ रोजीही आरोपीने अनेकांशी वाद घातला. दरम्यान, त्याने अथर्वसह काही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. त्याने अथर्वला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. प्रशांत भांडेकर यांनी बाजू मांडली.
अडीच वर्षीय बालकाच्या खुनात आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:23 IST
सत्र न्यायालयाने अडीच वर्षाच्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
अडीच वर्षीय बालकाच्या खुनात आरोपीला जन्मठेप
ठळक मुद्देसत्र न्यायालय : बुटीबोरीमधील घटना