शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तृतीयपंथींनी भरला अडीच लाख दंड

By admin | Updated: May 9, 2014 02:18 IST

रेल्वेगाड्यात चढून प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे वसूल करायचे. एखाद्याने पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून त्यांना त्रस्त करून सोडायचे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असताना..

व्हेंडरला २२ लाखाचा फटका : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाईनागपूर : रेल्वेगाड्यात चढून प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे वसूल करायचे. एखाद्याने पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून त्यांना त्रस्त करून सोडायचे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असताना मागील वर्षी 'आरपीएफ'च्या कारवाईत २२९ तृतीयपंथींकडून २.३0 लाख रुपये तर अवैध व्हेंडरकडून २२ लाख १६ हजार २९४ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.रेल्वेगाड्यात प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना तृतीयपंथींच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अश्लील हावभाव करून जबरदस्तीने पैसे वसूल करीत असल्यामुळे प्रवाशांचा नाईलाज होतो. कुटुंबासह प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना मागितले तेवढे पैसे काढून देण्याची पाळी येते. रेल्वे अँक्ट १४४ बी नुसार रेल्वेगाड्यात भीक मागणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांना पैशासाठी वेठीस धरणार्‍या २२९ तृतीयपंथींची धरपकड केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ लाख ३0 हजार रुपये दंड आकारला. परंतु असे असले तरी दंड भरून पुन्हा हे तृतीयपंथी दुसर्‍या दिवशी रेल्वेगाड्यात पैसे मागताना दिसतात. यामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे कुठलाही परवाना नसताना रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणे रेल्वे अँक्ट १४४ नुसार गुन्हा आहे. मागील वर्षी २ हजार ३८४ अवैध व्हेंडरवर कारवाई करून रेल्वे सुरक्षा दलाने २२ लाख १६ हजार २९४ रुपये दंड वसूल केला. याशिवाय रेल्वेस्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ५५२ नागरिकांवर रेल्वे अँक्ट १५९ नुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडूनही १ लाख ७३ हजार ६५0 रुपये दंड वसूल करण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी रेल्वे सुरक्षा दलाने पुरविली आहे. रेल्वे सुरक्षा दल तृतीयपंथी, अवैध व्हेंडर, नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणारे आदींविरुद्ध कारवाई करीत असले तरीसुद्धा दंड भरल्यानंतर पुन्हा हे आपल्या कामाला सुरुवात करीत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)