शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुनोनी खुनातील दोघांना जामीन

By admin | Updated: February 25, 2017 03:02 IST

उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोनी येथील एका खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला.

नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनोनी येथील एका खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. रणजित ईश्वर राठोड आणि बंडू सुरेश पवार, अशी आरोपींची नावे आहेत. शालिक जाधव, असे मृताचे नाव होते. प्रकरण असे की, जुनोनी गावात राहणारी मृत शालिकची वहिनी रेखाबाई जाधव ही १३ मे २०१५ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास प्रातर्विधीसाठी उठली असता तिला तिच्या घराच्या समोर ईश्वर राठोड, विलास राठोड, रणजित राठोड, बंडू पवार, रतन जाधव, सूरज पवार, संजय पवार आणि लक्ष्मण राठोड हे शालिक जाधव याच्यावर काठी, कुऱ्हाड आणि तुतारीने हल्ला करताना दिसले होते. ही घटना रेखाबाईचा जावई गणेश राठोड यानेही पाहिली होती. लागलीच रेखाबाईने ही घटना आपले पती रामप्रसाद जाधव यांना सांगितली होती. शालिकचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला होता. आरोपी रणजित राठोड याचे राणी नावाच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. उमरेड येथे राणीला रणजित राठोड याच्यासोबत पाहताच संतप्त झालेल्या शालिकने त्याला जबरदस्त मारहाण केली होती. या मारहाणीबाबत धडा शिकवण्याच्या हेतूने रणजित आणि अन्य आरोपींनी शालिकचा निर्घृण खून केला होता. रेखाबाईच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. आरोपींपैकी रणजित राठोड आणि बंडू पवार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)