शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोबाइलचे वेड जडलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. भावेश नरेंद्र चितमलकर असे त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मोबाइलचे वेड जडलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. भावेश नरेंद्र चितमलकर असे त्याचे नाव आहे.

१७ वर्षीय भावेश बारावीचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील शिक्षक असून बहीण वैद्यकीय क्षेत्रात काम करते. सक्करदरा येथील दत्तात्रेयनगरात चितमलकर कुटुंबीय राहते. भावेशला त्याच्या आईवडिलांनी क्रॅश कोर्ससाठी औरंगाबादला पाठवले होते. लॉकडाऊनमुळे तो औरंगाबादहून नागपुरात परतला. घरी आल्यानंतर तो सारखा मोबाइलमध्ये गुंतून राहायचा. आईवडील त्याला याबाबत विचारणा करीत होते. मात्र, तो वेळ मारून न्यायचा. गुरुवारी रात्री भावेशचे आईवडील त्यांच्या नातेवाइकांकडे गेले होते. रात्री ९ च्या सुमारास बहीण घरी परतली. तेव्हा भावेश त्याच्या शयनकक्षात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आपल्या आई-वडिलांना माहिती देऊन घरी बोलवून घेतले. त्यानंतर भावेशला डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या रूमची आणि बॅगची तपासणी केली. मात्र सुसाइड नोट अथवा असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे तूर्त गुलदस्त्यात आहे.

ठाणेदार सत्यवान माने यांनी भावेशच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडूनही कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने मोबाइल गेमच्या नादातून आत्महत्या केली का, असा प्रश्न केला असता पोलिसांनी त्याबाबत ठोस उत्तर देता येणार नाही, असे म्हटले.

---