शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तुषार कांति भट्टाचार्य अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:48 IST

नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशय : गुजरात पोलिसांची धावत्या रेल्वेत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणाºया बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. त्यांना नंतर नागपुरात आणून विमानाने अहमदाबादला नेण्यात आले.बुधवारी त्यांना सुरतच्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भट्टाचार्य यांच्या आप्तजनांनी लावला आहे. या कारवाईची आम्हाला सूचनाही देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.भट्टाचार्य यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी २०१० मध्ये नक्षली चळवळीचा प्रचार करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.परंतू, भट्टाचार्य हैदराबादमध्ये शिकत असताना १९७० मध्ये ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात भट्टाचार्य यांच्यावर २००७ मध्ये कोर्टात केस दाखल झाली.सुनावणी दरम्यान २००८ ते २०१३ पर्यंत ते आंध्रप्रदेशातील चेरलापल्ली कारागृहात बंद होते. ते कारागृहात बंदिस्त असतानाच २०१० मध्ये गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला अन् त्यांना फरारही घोषित केले. त्यामुळे खुद्द भट्टाचार्य यांनी ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नाही, कारागृहात आहो, अशी माहिती दिली होती. दरम्यान, २०१३ मध्ये सर्व प्रकरणातून मुक्तता झाल्यामुळे आंध्रप्रदेशातील कारागृहातून बाहेर आल्यानंतर भट्टाचार्य नागपुरातील निवासस्थानी राहू लागले.निर्वाहासाठी ते प्रसारमाध्यमात अधूनमधून लेख लिहीत असल्याचे कुटुंबीय सांगतात. असे असताना गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.माझ्या पतीचे अपहरणशोमा सेन यांचा आरोपमंगळवारी सकाळी ५.४५ ला झालेल्या या कारवाईची माहिती कळाल्यानंतर भट्टाचार्य यांच्या आप्तस्वकीयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या संबंधाने मंगळवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत तुषार कांति भट्टाचार्य यांची पत्नी नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख प्रा. शोमा सेन यांनी म्हटले की, २०१३ मध्ये कारागृहातून मुक्तता झालेल्या भट्टाचार्य यांना तब्बल चार वर्षांनंतर अटक करण्याची गरज गुजरात पोलिसांना का भासली. त्यांना कथित आरोपांमध्ये अटकच करायची होती, तर पोलीस त्यांच्या घरी का आले नाहीत, असा प्रश्नही सेन यांनी केला. अशा प्रकारे रेल्वेतून पोलिसांनी अपहरण करणे योग्य नाही. त्यांच्या क्रांतिकारी लिखाणामुळे घाबरून सरकारने ही डावबाजी केली आहे. बनावट प्रकरणे उघडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांच्या जमानतीचा प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला वीरा साथीदार होते. अशा प्रकारे त्रास देऊन त्यांना घाबरवले जात असल्याचे वीरा साथीदार म्हणाले. ं