शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

तूर डाळ आणखी महाग

By admin | Updated: September 5, 2016 02:25 IST

सप्ताहापूर्वी किरकोळमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपयांपर्यंत उतरलेली तूर डाळ सध्या १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे.

व्यापाऱ्यांची साठेबाजी : शासनाने कारवाई करण्याची मागणीनागपूर : सप्ताहापूर्वी किरकोळमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपयांपर्यंत उतरलेली तूर डाळ सध्या १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. व्यापाऱ्यांकडे जास्त दरातील डाळीचा साठा उपलब्ध असल्यामुळे व्यापारी दर कमी करण्यास तयार नाहीत. व्यापाऱ्यांची साठेबाजी दरवाढीस कारणीभूत असल्याचे समजले जात आहे. सणासुदीत सप्ताहापूर्वी सामान्यांना खरेदी करता येईल, अशा स्तरावर भाव आल्यानंतर व्यापाऱ्यांनी अचानक भाववाढ का केली, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. अन्न वितरण अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडील साठा तपासून आणि प्रसंगी जप्त करून सणांमध्ये मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध करून देण्याची मागणी विविध ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली. चणा डाळ १२० रुपये किलो नागपूर : चणा डाळीच्या किमतीतही प्रति किलो २० रुपयांची वाढ झाली आहे़ सप्ताहापूर्वी ८० ते १०० रुपये किलो असलेली चणा डाळ आता १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. अन्य डाळींमध्ये प्रति क्विंटलमागे ४०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मूंग मोगर दर्जानुसार ६५ ते ७० रुपये किलो, मूंग ६० ते ७०, मसूर डाळ ७० ते ८०, उडीद मोगर १२० ते १५०, हिरवा वाटाणा ३५ ते ५०, काबुली चणा दर्जानुसार ११० ते १५० रुपये किलो आहे. भाववाढीमुळे खरेदीला ब्रेक लागला आहे. छोटे दुकानदार आणि ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. ग्राहक केवळ सणांपुरतीच खरेदी करीत असल्याची माहिती धान्य बाजाराचे समीक्षक व एजंट रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.(प्रतिनिधी)गहू व तांदूळ वधारलेयावर्षी विदर्भात पुरेशा पाऊस न पडल्याने गहू आणि तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे. गहू क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी वधारला आहे. बाजारात लोकवन २५ रुपये किलो, तुकडा २७ रुपये, एमपी बोट २८ ते ३५ रुपये किलो आहे. याशिवाय दर्जानुसार तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. चिन्नोर ५० ते ५५ रुपये किलो, श्रीराम ५० रुपये, सुवर्णा २५ ते २८, बीपीटी ३२ ते ३४, एचएमटी ३७ ते ४० रुपये किलो दराने विक्रीस आहेत. कुटुंबातील प्रत्येकाचा मोबाईल, वाहन आणि इतर खर्च पाहता स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमती आटोक्यात आहेत. भाज्याही स्वस्त आहेत. गृहिणींनी महागाई वाढल्याची ओरड न करता इतर खर्चावर नियंत्रण आणण्याचे आवाहन रमेश उमाटे यांनी केले.