शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देएमए इंग्रजी तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थिनीचे वाढविले गुण उघडकीस आल्यानंतरही चौकशी नाही

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा उघडकीस आला आहे. एमए इंग्रजीच्या तृतीय सेमिस्टरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. या प्रकरणी दोषी आढळलेल्या चार कर्मचाऱ्यांवर कारवार्ई न करता त्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. या प्रकरणात जर चौकशी झाली असती तर अनेक खुलासे पुढे आले असते. परंतु असे करण्यात आले नाही. या गंभीर प्रकरणात विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी एमए इंग्रजी विषयाच्या तृतीय सेमिस्टरच्या परीक्षेत एका विषयात अनुत्तीर्ण झाली होती. तिला केवळ १२ गुण मिळाले होते.सूत्रांनुसार उत्तरपत्रिका मूल्यांकनानंतर तीन कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थिनीला मिळालेले १२ गुण वाढवून ४२ केले. कर्मचाऱ्यांनी हे काम अतिशय दक्षतेने केले. त्यामुळे गुणांची यादी बनविण्याच्या प्रक्रियेत देखील ही बाब लक्षात आली नाही. परीक्षा विभागातून फाईल गुणसूची बनविण्यासाठी पाठविण्यात आली. गुणसूची बनविताना गुणांमध्ये झालेली वाढ लक्षात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती परीक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. प्रकरणाची तपासणी करण्यानंतर गुण वाढविण्यात आल्याचे सिद्ध झाले. सूत्रांच्या मते गुणवाढ सिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. नीरज खटी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलाविले. सोबतच त्यांच्याकडून विचारणा केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना माहिती दिली. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता, त्यांची गुपचूप बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली.

प्रकरणाची चौकशी का नाहीप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची कुठलीच चौकशी केली नाही. छोट्याछोट्या विषयात चौकशी समिती गठित करणारे विद्यापीठ या प्रकरणात खुलासा झाल्यानंतरही चुप्पी साधून असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांच्या मते याबाबत चौकशी झाली असता, अनेक प्रकरणे पुढे आली असती.

परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविलीया प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविली आहे. इमारतीत एकाच दरवाजातून प्रवेश देण्यात येत आहे. उर्वरित सर्व दरवाजांना कुलूप लावण्यात आले आहे. परीक्षा भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून विचारपूस होत आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतरही त्यांना आत जाऊ देण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांना कुणासोबतही बोलण्याची परवानगी नाही.

एका दिवसात अनेक बदल्यासूत्रांच्या मते हे प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा विभागात मोठा फेरबदल करण्यात आला. शुक्रवारी अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अचानक आदेश मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. बऱ्याच वर्षानंतर परीक्षा विभागात बदल्या झाल्या आहेत.

जे लिहायचे आहे ते लिहायासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. डॉ.येवले सुटीवर असल्याने त्यांच्याशी बोलणे झाले नाही. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती न देता, जे लिहायचे आहे ते लिहा, असे सांगून विषय टाळला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ