शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

कोरोनाची दुसरी लाट नव्हे ‘त्सुनामी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोनाची ही दुसरी लाट नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, ज्या झपाट्याने रुग्ण वाढत आहे, ही तर ‘त्सुनामी’ ...

नागपूर : कोरोनाची ही दुसरी लाट नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, ज्या झपाट्याने रुग्ण वाढत आहे, ही तर ‘त्सुनामी’ असल्याची बोलले जात आहे. गुरुवारी १९७९ नव्या रुग्णांची भर पडली, तर १० रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १६४०३२ झाली असून, मृतांची संख्या ४४२५ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा या १२ महिन्यांच्या कालावधीत १८ सप्टेंबर रोजी २३४३ हा दैनंदिन रुग्णसंख्येतील उच्चांक होता. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सध्या ज्या गतीने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यानुसार पुढील काही दिवसांत ही संख्या आणखी वाढणार आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्ण बरे होण्याच्या दरात मागील महिन्याच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घट आली आहे.

नागपूर जिल्ह्यात गुुरुवारी १०११४ चाचण्या झाल्या. यात ७९५४ आरटी-पीसीआर, तर २१६० रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटी-पीसीआरमधून १६६७, तर अँटिजेनमधून ३१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हिटीचा दर १९.५६ टक्के आहे. मागील वर्षी ११ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात झाली. परंतु, उच्चांक गाठायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. सप्टेंबर महिन्यात कमालीची वाढ झाली. ८ सप्टेंबर रोजी १९२४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी रुग्णसंख्या वाढून २०६२ झाली. पुढील सात दिवस १४०० ते १७०० दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या असताना १८ सप्टेंबर रोजी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. नंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात, तर रोजची रुग्णसंख्या ५० पर्यंत खाली आली. सप्टेंबरनंतर आता पुन्हा सहा महिन्यांनी रुग्संख्या वाढताना दिसून येत आहे.

- शहरात १६०३, ग्रामीणमध्ये ३७३ रुग्ण

शहरात आज १६०३, ग्रामीणमध्ये ३७३, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणच्या तुलनेत शहरात कोरोना वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी आहे. मृतांमध्ये आज शहरात ६, ग्रामीणमध्ये १, तर जिल्ह्याबाहेरील तीन मृत्यू आहेत. आतापर्यंत शहरात रुग्णांची एकूण संख्या १३०९६४, तर मृतांची संख्या २८४७ झाली. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या ३२०९६, तर मृत्यू ७८८ आहेत.

-९३६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९४ टक्के होता. या महिन्यात पाच टक्क्यांनी घसरून तो ८९ टक्क्यांवर आला आहे. सध्या शहरात ११८०४३, ग्रामीणमध्ये २८३७६ असे एकूण १४६४१९ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ३८२४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये, तर ९३६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. सक्रिय रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

-अशी वाढली रुग्णसंख्या

१ मार्च : ८७७

२ मार्च : ९९५

३ मार्च : ११५२

४ मार्च : १०७०

५ मार्च : १३९३

६ मार्च : ११८३

७ मार्च : १२७१

८ मार्च : १२७६

९ मार्च : १३३८

१० मार्च : १७१०

११ मार्च : १९७९