शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकृषक भूखंडांच्या रजिस्ट्रीचा प्रयत्न

By admin | Updated: February 6, 2017 02:09 IST

तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी आणि आंगेवाडा येथे शेती अकृषक न करता तसेच व नगररचना विभागाची परवनगी न घेता भूखंड पाडण्यात आले.

तहसीलदारांमुळे प्रकार उघड : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सावनेर : तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी आणि आंगेवाडा येथे शेती अकृषक न करता तसेच व नगररचना विभागाची परवनगी न घेता भूखंड पाडण्यात आले. यातील काही भूखंडांची सावनेर येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात रजिस्ट्री लावण्यात आली. त्याचवेळी तहसीलदार राजू रणवीर दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्याने हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या प्रकरणी तहसीलदार रणवीर यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्य शासनाने अकृषक व नगररचना विभागाची परवानगी (एनएटीपी) नसलेल्या भूखंडांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. संबंधितांनी पाटणसावंगी येथे सर्वे क्रमांक - ४१५ /ब, आंगेवाडा येथे सर्वे क्रमांक ३२७/१ व सावनेर येथे सर्वे क्रमांक १९/२ व १९/३ या शेतीवर भूखंड पाडण्यात आले असून, त्यासाठी ही शेती अकृषक करण्यात आली नाही तसेच नगररचना विभागाची परवानगीही घेण्यात आली नाही. या भूखंडांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनी या शेतांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, ही शेती एनएटीपी करण्यात आली नसल्याचे आढळून आल्याने या शेतांमध्ये पाडण्यात आलेल्या भूखंडांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, पाटणसावंगी येथील आठ, आंगेवाडा येथील पाच आणि सावनेर येथील काही भूखंडांची मंगळवारी सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात रजिस्ट्री लावण्यात आली होती. या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार राजू रणवीर यांनी लगेच दुय्यम निबंधकाचे कार्यालय गाठले. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला असून, रणवीर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे तक्रार केली आहे. दुय्यम निबंधक सावनेर यांनी कृषक जमिनीचे कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांचे आदेश नसताना प्लॉटच्या दस्ताची नोंदणी करून शासनाची फसवणूक केली. (प्रतिनिधी)