शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दारूची वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या ...

बुटीबोरी (नागपूर) : औरंगाबादवरून नागपूर येथे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळला. पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाला. बुटीबोरी पोलीस स्टेशनअंतर्गत वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. हेमराज ऊर्फ पिंट्या देवीदास पिंपळे (२५, रा.मासळ, ता.लाखांदूर. जि. भंडारा) असे मृत चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक हेमराज हा नागपूर येथील भारतीय रोड कॅरिअर ट्रान्सपोर्टमध्ये दीड वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे औरंगाबादवरून अशोक लेल्यांड ट्रक (क्र. एमएच ४० वाय ८१२६) विदेशी दारू ओसीब्लू १८० एम एल.निपा असलेल्या ३०० पेट्या, तर बी सेवनचे ७५० एमएलच्या बॉटल असलेल्या ७०० पेट्या असा हजार पेट्या माल घेऊन नागपूरकडे निघाला. गुरुवारी मध्यरात्री जवळपास १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा वाय पॉइंटवरील उड्डाणपुलानजीक ट्रक पोहोचला असता, रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने, तो चुकीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाला. त्याच वेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाखाली कोसळला. दरम्यान, पुलानजीक असलेल्या विद्युत खांबाच्या जिवंत तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने आग लागली.

या घटनेत हेमराजला स्वत:ला वाचविण्यास संधी मिळाली नसल्याने, त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती, आशिष मोरखडे, अनिल व्यवहारे, बाबुलाल वडमे, सतेंद्र रंगारी, नारायण भोयर, विनायक सातव, राकेश तालेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रकमध्ये दारू असल्याने आगीचे रौद्र रूप होते. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या मदतीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.

चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

दारूच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यात पोलीस आणि अग्निशनम दलाला चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. यात चालकांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याचे खंत ठाणेदार कोकाटे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत दारू आणि ट्रक असा एकूण ८० लाख ६७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाल्याची नोंद घेण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय भारती या घटनेचा तपास करीत आहेत.