नागपूर : एका ट्रक ड्रायव्हरचा निर्घृण खून करून त्याच्याजवळील १ लाख २५ हजार रुपये लुटून नेण्यात आले. ही घटना मौदा रोडवरील गुमथळा येथे उघडकीस आली. यावेळी मृत ट्रक ड्रायव्हर एकटाच होता. त्याचा क्लिनर सोबत नव्हता. रामू सखाराम पालियाड रा. लोलमामडा मंडल, नेरीडीगुंडा जिल्हा आदिलाबाद असे मृताचे नाव आहे. सूत्रानुसार मौदा जवळ एमएच ३१/डीएस/११७७ या क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रकच्या कॅबिनमध्ये रक्ताने माखलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह पडून होता. हा ट्रक राजनांदगाववरून नागपूरला येत होता. मंगळवारी रात्री मौदा येथील ५ नंबर नाक्याजवळ मौदाकडे जाणाऱ्या रोडवरील गुमथळा येथे हल्दीराम कंपनीजवळ ट्रक चालकाचा खून करण्यात आला. त्याच्याजवळचे १ लाख २५ हजार रुपये लुटून नेण्यात आले. रामू हैदराबाद-नागपूर रोडवेजचे ट्रक चालवित होता. बुधवारी सकाळी कुणीतरी ट्रकमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह असल्याची माहिती मौदा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.(प्रतिनिधी)
ट्रक चालकाचा खून
By admin | Updated: May 19, 2016 02:40 IST