शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने तरुणास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरात धडक झाल्यानंतर, तिन्ही दुचाकीस्वार खाली काेसळले. त्यांनी स्वत:ला सावरण्याच्या आत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरात धडक झाल्यानंतर, तिन्ही दुचाकीस्वार खाली काेसळले. त्यांनी स्वत:ला सावरण्याच्या आत वेगात आलेल्या ट्रकने त्यातील एकास चिरडले. यात दाेघे गंभीर जखमी झाले, ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील घुबडमेट येथे शनिवारी (दि. २०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

सुमित अशाेक साेमकुवर (२५, रा.लाडगाव, ता.काटाेल) असे मृताचे, तर लीलाधर रामचंद्र ढोक, रा़ जामगाव, ता. नरखेड व अरुण बावणे, रा़ कलंभा, ता. काटाेल अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

सुमित, लीलाधर व अरुण हे तिघेही एमएच-४०/एव्ही- ९५१५ आणि एमएच-३१/बीए-७६५५ क्रमांकाच्या माेटारसायकलींनी काटाेलच्या दिशेने येत हाेते. या दाेन्ही माेटारसायकलींची घुबडमेट येथे जाेरात धडक झाल्याने तिघेही खाली काेसळले. सुमित व अरुण राेडवर पडले, तर लीलाधर बाजूला फेकला गेला. त्यातच काटाेलहून सावरगावच्या दिशेने वेगात जाणाऱ्या एमएच-३१/सीक्यू-२१७१ क्रमांकाच्या ट्रकने सुमितला चिरडले, तर अरुण त्या ट्रकच्या समाेरच्या चाकाखाली आला. यात सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही जखमींना उपचारासाठी सुमितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तिथे दाेन्ही जखमींवर प्रथमाेपचार केल्यानंतर, त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. दाेन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक आकाश शाही करीत आहेत.