शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

माल वाहतुकीच्या वाहनाची धडक, महिला गंभीर जखमी; घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला

By दयानंद पाईकराव | Updated: December 25, 2023 15:01 IST

त्या आपल्या अ‍ॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, एफ. डब्ल्यू-५२४५ ने सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजभवन चौक येथून जात होत्या.

नागपूर : माल वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे अ‍ॅक्टीव्हावरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. रजिया खान दराज खान (वय ४६, रा. हमीदनगर, गोरेवाडा) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या अ‍ॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, एफ. डब्ल्यू-५२४५ ने सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजभवन चौक येथून जात होत्या.

तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रजिया यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. रजिया खाली पडून त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.

रजिया यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत त्यांनी रविवारी २४ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.