शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसा मंजुरीसाठी करावे लागत आहे दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:51 IST

visa Nagpur News नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.

ठळक मुद्देनागपुरातच कार्यालय सुरू करण्याची मागणीज्येष्ठ नागरिकांना जास्त अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणावर विदेशात असून त्यांच्या नातेवाईकांचे तिकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र त्यांना व्हिसासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागते. कोरोनाच्या संसगार्मुळे वाहतुकीची साधनेदेखील सहजपणे उपलब्ध नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी तर बाहेरगावी प्रवास करणे धोक्याचेदेखील ठरू शकते. नागरिकांचे हित लक्षात घेता नागपुरातदेखील व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावतीसह विदर्भातील हजारो तरुण विदेशांमध्ये शिक्षण किंवा रोजगारानिमित्त गेलेले आहेत. काही जण तर तेथे स्थायिकदेखील झाले आहेत. त्यांच्याकडे जाण्यासाठी कुटुंबातील लोकांना व्हिसा घेणे आवश्यक असते. मात्र त्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते. या प्रक्रियेत २ ते ३ दिवस जातात. अशा स्थितीत त्यांची अडचण होते. विशेषत: अनलॉकडाऊनचे टप्पे सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळण्यावरच लोकांचा भर आहे. लोक विमान, बसने प्रवास करणे टाळत आहे. खासगी वाहनाने गेले तर जाण्यासाठीच १६ ते २२ तास लागत आहे. इतका दूरचा प्रवास करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक होते.नागपूर देशाचे केंद्रस्थान आहे. येथे व्हिसा कार्यालय सुरू झाले तर मध्य भारतातील लोकांनादेखील त्याचा फायदा होईल. त्यामुळेच येथे व्हिसा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात केशव कुकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रदेखील लिहिले आहे.

टॅग्स :Visaव्हिसा