शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

पुण्यनगरीचा हितवादवर रोमांचक विजय

By admin | Updated: January 6, 2015 01:02 IST

अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात सोमवारी पुण्यनगरीने १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएस आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत हितवाद संघावर अवघ्या दोन धावांनी सरशी साधली.

अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धानागपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात सोमवारी पुण्यनगरीने १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएस आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत हितवाद संघावर अवघ्या दोन धावांनी सरशी साधली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशन ट्युटोरियल्स हे सहप्रायोजक आहेत.दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर झालेल्या या रंगतदार लढतीत हितवादला विजयासाठी तीन चेंडूत तीन धावांची गरज होती व त्यांची अखेरची जोडी मैदानात होती. पण रवी डफने देवेंद्र काकडेचा सुरेख झेल घेत माजी विजेत्यांच्या आशेवर पाणी फेरले. त्याआधी प्रथम फलंदाजी घेणाऱ्या पुण्यनगरीने ३० षटकांत ८ बाद १३८ धावा उभारल्या. डफने त्यात सर्वाधिक ५६ धावांचे(४७ चेंडू, १० चौकार, १ षटकार) योगदान दिले. मनोज झारिया याने १५ चेंडू टोलवित पाच चौकारांसह २४ आणि अश्वजित मून याने दोन चौकार व एका षटकारासह नाबाद २१ धावांचे योगदान दिले.पाठलाग करणाऱ्या हितवाद संघाने नियमित फरकाने फलंदाज गमावले. अनुभवी फलंदाज प्रवीण लोखंडे हा खेळपट्टीवर असेपर्यंत विजय दृष्टिपथात होता. तो चार चौकारांसह ३७ धावा काढून परतल्यानंतर परितोष प्रामाणिक याने संघर्ष करीत विजयाची आशा पल्लवित केली होती. त्याने ११ चेंडूंवर १७ धावा केल्या. पण एक टोक सांभाळण्यात त्यालाही अपयश दोन धावांनी सामना गमविण्याची संघावर वेळ आली. रवी डफ सामन्याचा मानकरी ठरला.धनवटे नॅशनल कॉलेजच्या वसंत नगर मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सकाळने तरुण भारत संघाचा सहा गड्यांनी पराभव करीत चुरस कायम राखली. तरुण भारतने २० षटकांत चार गडी गमावून १४७ धावा फळ्यावर लावल्या. सकाळने हे लक्ष्य सहा गडी राखून गाठले. देवेंद्र देशपांडे याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.उद्या मंगळवारी सकाळी ९.३० पासून तरुण भारत- लोकशाही वार्ता हा सामना डॉ. आंबेडकर कॉलेज मैदान आणि दशोन्नतीविरुद्ध दै. भास्कर हा सामना वसंत नगर मैदानावर खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)