शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

जॉर्ज फर्नांडिस यांना लोकप्रतिनिधींनी वाहिली शब्दसुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:42 AM

माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना नागपुरातील लोकप्रतिनिधींनी आपली शब्दसुमनांजली अर्पण केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: माजी केंद्रीय मंत्री व धडाडीचे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना नागपुरातील लोकप्रतिनिधींनी आपली शब्दसुमनांजली अर्पण केली.प्रामाणिक नेतृत्व काळाच्या पडद्याआडजॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाने कष्टकरी, कामगारांसाठी प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. फर्नांडीस यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या कल्याणासाठीच खर्ची घातले. भारतातील कामगार चळवळीला त्यांनी आपल्या संघर्षशील नेतृत्त्वाने नवीन दिशा दिली. कामगारांच्या हक्कासाठी लढत असताना स्वत:च्या जीवाचीही त्यांनी पर्वा केली नाही. वंचितांचे कल्याण हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांच्या प्रामाणिक नेतृत्त्वाची उणीव नेहमीच जाणवणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री

निष्ठेने जीवन जगणारा नेताजॉर्ज फर्नांडिस यांचा एकेकाळी देशातील सर्व कामगार संघटना व युनियन्सवर प्रभाव होता. एका शब्दात टॅक्सी, आॅटो व रेल्वेची चाके थांबविण्याची ताकद त्यांच्यात होती. मात्र त्यांनी आयुष्यभर समाजवादी विचारांशी कधीही फारकत घेतली नाही. मंत्री असतानाही ते स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे, एवढा वैचारिक साधेपणा त्यांच्यात होता. माझी वैयक्तिक आठवणही आहे. माझे आॅपरेशन झाले तेव्हा रुग्णालयात असताना ते आवर्जून भेटायला आले होते. निष्ठेने जीवन जगणाऱ्या नेत्याला आपण गमावले आहे.- गिरीश गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

कामगार चळवळीचा प्रणेता काळाने हिरावलाजॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातले एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. एका हाकेवर मुंबई बंद करण्याची ताकद असलेला लढवय्या कामगार नेता म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रीय राजकारणात जॉर्ज फर्नांडिस यांचे महत्त्वाचे स्थान होते. रेल्वे, उद्योग आणि संरक्षण ही महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. ते संरक्षण मंत्री असताना पोखरणची अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली, तर कारगीलच्या युद्धात आॅपरेशन विजय करत पाकिस्तानला पाठीमागे धाडण्यात त्यांना यश आले. त्यांच्या दु:खद निधनाने एक नि:स्वार्थी नेता तसेच कामगारांचा पाठीराखा व कामगार चळवळीचा प्रणेता काळाने हिरावला.-डॉ.आशिष देशमुख, माजी आमदार

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस