शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात राहणाऱ्या आदिवासींना ‘शबरी घरकूल’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:42 IST

सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात राहणाऱ्या फक्त २७ आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

ठळक मुद्दे११ वर्षात फक्त २७ लाभार्थ्यांनाच लाभ शेकडो अर्ज अजूनही प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राहणाऱ्या आदिवासींसाठी शासनाने शबरी घरकूल योजनेची २००९ पासून अंमलबजावणी केली. पण या योजनेसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने गेल्या ११ वर्षात फक्त २७ लोकांना शबरीचा लाभ मिळाला. अजूनही शेकडोच्या संख्येने अर्ज प्रकल्प कार्यालयात पेंडिंग पडलेले असून, अनुसूचित जमातीतील अनेकांना अजूनही ‘शबरीची’ प्रतीक्षा आहे.महापालिकेतर्फे अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर शहरातील अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकूल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आदिवासी संघटनांनी शासनाकडे केली होती. २००९ पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर यांच्याकडे योजनेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. शबरी घरकूल योजनेसाठी नागपूर प्रकल्पाअंतर्गत २००९ ते २०१४-१५ या कालावधीत एकूण ३८ आदिवासी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नागपूर शहर (महानगर पालिका क्षेत्र) करिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून प्रती घरकूल २ लाख रुपये प्रमाणे २७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तेव्हा अर्ज केलेले ११ लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरही २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ४० लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. २०१८-१९ मध्ये ३०० च्या जवळपास अर्ज नव्याने दाखल झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ पासून शबरीच्या अंमलबजावणीकरिता निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल मंजुरीबाबतची कार्यवाही करण्यात आली नाही. सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत फक्त २७ आदिवासींना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे.

शासनाने तत्काळ निधीला मंजुरी द्यावीगेल्या ११ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच शहरातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाचे अध्यक्ष दिनेश शेराम, उपाध्यक्ष विजय परतेकी, स्वप्निल मसराम, सुरेंद्र नेताम, अनिकेत माकोडे, विनय ऊइके, राहुल मेश्राम , राजेश ऊइके, राकेश पाल, दिवेश धुर्वे आदींनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार