शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 10:55 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही.

ठळक मुद्देविभागांच्या असमन्वयात शिष्यवृत्ती रखडली सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने वर्ग १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना राबविली. परंतु गेल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळाला नाही. विशेष म्हणजे ही योजना आदिवासी विभागाकडून राबविण्यात येते. पण शिष्यवृत्तीचे वितरण माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येते. या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने २०१६ -२०१७ व २०१७-१८ या वर्षातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.आदिवासी विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १ ते १० च्या विद्यार्थ्यांना १००० ते २००० रुपये दरम्यान शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज दाखल करायचे होते. विद्यार्थ्यांना अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडायचा होता. गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विभागाने शिष्यवृत्तीचे हे काम ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिले आहे. आदिवासी विभाग आलेल्या अर्जानुसार शिक्षण विभागाला निधी उपलब्ध करून देते. शिक्षण विभागाला तो निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचा आहे. पण २०१६-१७ व २०१७-१८ या दोन्ही वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची ओरड शाळेकडून होत आहे. शाळांनी यासंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभाग व आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयाकडेही पाठपुरावा केला. पण शिष्यवृत्तीचा गुंता काही सुटला नाही. त्यामुळे विद्यार्थी आजही शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहे. तिकडे पालकांकडून शिक्षकांना शिष्यवृत्तीची विचारणा होत असल्याने शिक्षक ठोस कारण सांगण्यास हतबल ठरत आहे. त्यामुळे पालकांकडून शिक्षकांवरच संशय व्यक्त केला जात आहे.यासंदर्भात आदिवासी विभागाचे नागपूर प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या याद्या व निधी माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा अहवालही मागितला आहे. परंतु त्यांच्याकडून अहवाल आलेला नाही.यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागातील शिष्यवृत्तीचे काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की २०१६-१७ चा निधी वाटप करण्यात आला आहे. २०१७-१८ च्या याद्या आल्या आहेत. आठवड्याभरात विद्यार्थ्यांचा खात्यात पैसे जमा होईल.शिष्यवृत्तीच्या बाबतीत दोन्ही विभागाकडून वेगवेगळे खुलासे आले असले तरी, २०१५-१६ पासूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी जोतोय कुठे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र