शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी हे हिंदूच

By admin | Updated: October 4, 2015 03:14 IST

वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत.

आदिवासी मंत्री विष्णू सावरा : अ. भा. वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ता संमेलन नागपूर : वनात राहणारे वनवासी म्हणा किंवा आदिवासी अर्थ एकच आहे. आदिवासी हे हिंदूचेच घटक असून ते हिंदूच आहेत. त्यामुळे आदिवासींना हिंदूंपासून वेगळे करण्याचे षड्यंत्र कधीही यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे केले. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्ता संमेलनातील एका सत्रात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल आणि आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवराव व्यासपीठावर होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, आदिवासींसाठी वनवासी कल्याण आश्रमाद्वारे सुरूअसलेले काम अतिशय योग्य आहे. आदिवासींचे अधिकार हिरावून घेण्यासाठी काही लोकं स्वत:ला आदिवासी म्हणवून घेत आहेत. आदिवासींमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण शासनस्तरावर लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी अ.भा. वनवासी कल्याण आश्रमातर्फे प्रकाशित वनबंधू या मासिक पत्रिकेच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक ग्रामपंचायतीला १० लाखशासनातर्फेसुद्धा आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळे काम केले जात आहे. राज्य सरकार राज्यातील ग्रामपंचायतींना यंदा २५८ कोटी रुपये देणार आहे. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट १० लाख रुपये मिळतील. यासोबतच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यंदा २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. एकात्म दर्शन हा भारताचा आत्मा ईश्वर हा प्रत्येक सजीवात वास करतो. तो मनुष्य, पशु, पक्षी इतकेच नव्हे तर वृक्षांमध्येसुद्धा आहे, अशी आपली भारतीय विचारधारा आहेत. त्यामुळे आपण सर्व मनुष्याप्रति, पशुपक्ष्यांप्रति इतकेच नव्हे तर वृक्षांप्रति सुद्धा आदरभाव ठेवतो. हा प्रकार केवळ भारतात दिसून येतो. तो दुसऱ्या कुठल्याही देशात दिसून येत नाही. हाच एकात्म भाव आहे. तो भारताचा आत्मा आहे. रोजच्या व्यवहारात आपण तो जगतो. भारताची ही अमूल्य देण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.