शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

झाडांमध्ये रस्ता की रस्त्यात झाडे!

By admin | Updated: June 20, 2016 02:35 IST

मागील काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असलेला महाराजबागेतील मुख्य रस्ता हा उत्तर अंबाझरी मार्ग ...

नागपूर : मागील काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असलेला महाराजबागेतील मुख्य रस्ता हा उत्तर अंबाझरी मार्ग व अमरावती रोडला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या रस्त्यांवरून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ असते. यात मागील वर्षभरापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. परंतु ते अत्यंत संथगतीने सुरू असल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय सध्या रस्त्यांत झाडे आहेत, की, झाडांत रस्ता आहे! असे चित्र दिसून येत आहे. वास्तविक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी येथील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र यानंतर अजूनही अनेक झाडे रस्त्याच्या मध्ये उभी आहेत. शिवाय त्या झाडांच्या सोबतीला ठिकठिकाणी विजेचे खांबसुद्धा आहेत. हा रस्ता तयार करीत असलेल्या कंत्राटदाराने रस्त्यावरील सर्व झाडे आणि विजेच्या खांबाभोवती डांबरीकरण केले आहे. यामुळे ती सर्व झाडे आणि विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत.पावसाळ््यात समस्या वाढणार नागपूर : महाराजबाग परिसरात रस्त्याच्या कामामुळे अनेक झाडांची मुळे उघडी पडली असून, ते वादळाच्या तडाख्यात रस्त्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातून या रस्त्यावर फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या रस्त्यावर महाराजबाग उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वारसुद्धा आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची थेट या रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्याने तो ठिकठिकाणी खोदण्यात आला असून, जागोजागी दगड, रेती व मातीचे ढीग टाकण्यात आले आहे. यामुळे येथून वाहनचालकाला फार मोठी कसरत करीत मार्ग काढावा लागतो. सध्या पावसाळा सुरू झाला असून, येथे पहिल्याच पावसात वाहतुकीची फार मोठी तारांबळ उडणार आहे. यात या रस्त्याचे काम फारच कासवगतीने सुरू आहे. त्याचाही वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोकांच्या सुविधेसाठी या रस्त्याच्या कामाला वेग देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)