शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभवण्याचा इशारा देण्यात येत आहे. अशा स्थितीत मुलांमध्ये कोरोनाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभवण्याचा इशारा देण्यात येत आहे. अशा स्थितीत मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करण्यात यावेत, तसेच बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आ‌वाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालचिकित्सा विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारोनाची तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. जैन बोलत होत्या.

ग्रामीण, तसेच शहरी भागातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. कोरोना झालेल्या बाळांमध्ये थोडी वेगळी लक्षणे आढळतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील वातावरण, राहणीमानही थोडे वेगळे असते. त्यामुळे अशा भागांत राहणाऱ्या बाळांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, पोट दुखणे, जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात, अशी माहिती डॉ. जैन यांनी दिली.

अशी घ्यावी बाळांची काळजी

-भरपूर पाणी पाजा.

-बालकांना पातळ आहार द्यावा.

- ताप, ऑक्सिजन पातळी मोजत राहा.

-१०० फॅरनहिट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामॉल द्या.

-ताप असल्यास दर सहा तासांनी पॅरासिटामॉल देता येईल.

-कोरोनासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका.

-चार दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर बाळाला दवाखान्यात न्यावे.

-बाळाला श्वसनास त्रास होत असेल तरी दवाखान्यात न्यावे.

-भूक कमी होणे, बाळ सुस्त असल्यासही तातडीने सल्ला घ्यावा.