शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

‘ट्रॅव्हल्स’ पुढे एसटी मागे !

By admin | Updated: November 17, 2015 04:20 IST

उपराजधानीत काही खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्रास टप्पा वाहतूक करतात. एसटीच्या थांब्यावर आपल्या बसेस उभ्या

नागपूर : उपराजधानीत काही खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्रास टप्पा वाहतूक करतात. एसटीच्या थांब्यावर आपल्या बसेस उभ्या करून प्रवासी बळकवतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांची सुरिक्षतता धोक्यात आली आहे. दुसरीकडे हे थांबे एसटीचे की ट्रॅव्हल्सचे हा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलीस विभाग या दोघांना कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, रहाटे कॉलनीपासून ते इंदोरा चौकापर्यंत वाहतूक पोलिसांच्या देखत हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अधिकृत बंदी आहे, या बसस्थानकाच्या परिसरात याचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येते. गणेशपेठ चौकातच वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. ट्रॅव्हल्स भर रस्त्यावर उभी करून प्रवाशांना ओरडूनओरडून बोलविले जाते. काही ट्रॅव्हल्सवाले तर रस्त्याच्यामधोमध गाडी सुरू करून मागे-पुढे करीत असतात. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान हा प्रकार सुरू होतो. प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक ट्रॅव्हल्सवाल्यांची लांबलचक रांग लागलेली असते. काही ट्रॅव्हल्स मालकांनी चौकाच्या आजूबाजूला आपले दुकान थाटले आहेत. दुकानासमोरील पार्किंगच्या ठिकाणी हे आपली ट्रॅव्हल्स बस घुसवून ठेवतात, आणि जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा वाहतुकीची पर्वा न करता रस्त्यावर आणतात. (प्रतिनिधी)वर्धा मार्गावर सर्वाधिक धावतात ट्रॅव्हल्स४शहरातून सर्वच मार्गावर ट्रॅव्हल्स बसेस धावत असल्या तरी वर्धा मार्गावर याचे प्रमाण मोठे आहे. या मार्गावर साधारण २००वर ट्रॅव्हल्स धावतात. या मार्गावरील रहाटे कॉलनी हा एसटीचा मुख्य थांबा आहे. परंतु या थांब्यावरील स्थिती भयावह आहे. वळणावर हा थांबा असतानाही एसटीच्या मागे खासगी ट्रॅव्हल्सवाले आपली बस उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. छत्रपती चौकात तर खासगी बसमुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यावर उभी असलेली बस आणि उड्डाण पुलावरून खाली येणाऱ्यांची एकच गर्दी होते. प्रवाशांना ओरडून बोलवितात४इंदोरा चौक, बैद्यनाथ चौक, गणेशपेठ चौक, गीतांजली चौक, मानस चौक, बोले पेट्रोल पंप चौक, छत्रपती चौक, रविनगर चौक, सक्करदरा चौक येथे खासगी ट्रव्हल्सवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यातील अनेकांकडे ट्रॅव्हल्स बस उभी करण्याची सोय नाही. परिणामी या बसेस रस्त्यावर उभ्या असतात. यांचे एजंट प्रवाशांना ओरडून-ओरडून बोलवितात. यामुळे वाहतुकीची कोंडी व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांची धावपळ ४एसटीच्या थांब्यावर खासगी बस उभ्या होत असल्याने एसटीचालकांना एकतर त्यांच्या मागे किंवा समोर बस उभी करावी लागते. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांना बस नेमकी कुठे थांबणार आहे ते कळतच नाही. यामुळे वेळेवर धावपळ उडते. विद्यार्थी व वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतो.प्रवासी मिळविण्यासाठी ओव्हरटेक४झटपट प्रवासी मिळविण्याच्या नादात ट्रॅव्हल्सचे चालक एसटींनाच नाहीतर आपल्या प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही ओव्हरटेक करतात. रहाटे कालनी चौक, मानस चौक, रवीनगर चौक, सदर, जगनाडे चौक व पारडी या महत्त्वाच्या मार्गावर ही जीवघेणी स्पर्धा सुरू असते. यांच्या या स्पर्धेत सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.काय म्हणतो कायदा४खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना टुरिस्ट परवाना देण्यात येतो. यात त्यांना एकाच ठिकाणावरून प्रवासी घेऊन नियोजित स्थळी थांबवण्याची परवानगी असते. टप्पा वाहतूक परवाना फक्त एसटीला आहे. एसटीची बस नियोजित मार्गावर कुठूनही प्रवासी घेऊ शकते. दोषींवर कारवाई करणार खासगी बसेसला टप्पा वाहतूक करता येत नाही. अशा बसेससाठी थांबे निश्चित करणे आवश्यक आहे परंतु अद्याप अशी सोय झालेली नाही. ट्रॅव्हल्स बसेसकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर नागपूर