शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली

By admin | Updated: February 3, 2017 02:38 IST

लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली.

५ जण गंभीर जखमी : २० जणांना किरकोळ दुखापतकळमेश्वर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन कळमेश्वर मार्गे नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही ट्रॅव्हल्स उलटली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, अन्य २० जणांना किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - १४ मैल बायपास मार्गावरील चौकात गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींमध्ये गुणवंता ढोमणे (५४), परितोष बांगडकर (१८), महादेव टेकाडे (४६), रमेश रेवतकर सर्व रा. नरखेड यांच्यासह अन्य एकाचा समावेश असून, या पाचही जणांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या अपघातात आकाश खोडे (१४, रा. सावंगी, जिल्हा वर्धा), नामदेव रेवतकर (५९, रा. नरखेड), कृष्णाजी बारई (६०, रा. फेटरी) यांच्यासह अन्य १७ जणांना किरकोळ दुखापत झाली असून, या सर्वांवर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व काही वेळाने त्यांना सुटी देण्यात आली. नरखेड येथील शंकरराव टेकाडे यांचा मुलगा अमित टेकाडे याचा लग्नसमारंभ नागपूर येथे असल्याने संपूर्ण वऱ्हाडी एमएच-३१/इएम-०८७६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने नरखेडहून नागपूरला जात होते. ते नरखेडहून सकाळी ७ वाजता निघाले होते. ही ट्रॅव्हल्स कळमेश्वर - १४ मैल मार्गावरील बायपास चौकात पोहोचताच मागून भरधाव येणाऱ्या एमएच-४६/एफ-५१९५ क्रमांकाच्या टँकरने या ट्रॅव्हल्सला मागून जोरदार धडक दिली. त्यात पाच जण गंभीर व २० जण किरकोळ जखमी झाले. किंचाळण्याच्या आवाजामुळे एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या कामगारांनी सर्व जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले. गंभीर जखमींना नागपूरला हलविले तर किरकोळ जखमींना सुटी दिली. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्षकळमेश्वर बायपासवरील या चौकात वारंवार अपघात होतात. कारण, वाहनचालक कशाचीही तमा न बाळगता वेगात वाहने नेतात. याच ठिकाणी चार दिवसांपूर्वी अपघात झाला असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी या ठिकाणी दोन ट्रकची धडक झाली होती. त्यामुळे या चौकातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. यासाठी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले होते. परंतु, बांधकाम विभागाने या चौकात गतिरोधक तयार करण्याची तसदी घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.