शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जनरलच्या तिकीटावर ‘स्लिपर क्लास’ने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:07 IST

रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी २० लाख प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देपार्सल्सही लपविले : १.२० कोटींची  प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेने प्रवास करायचा झाला की अनेकजण जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात आणि थेट स्लिपरक्लास कोचमध्ये घुसतात. यामुळे रेल्वेचाही महसूल बुडतो अन् स्लिपरक्लासमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल ते आॅगस्टदरम्यान अशा १ कोटी २० लाख प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला.रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी अनेक प्रवासी आधीच प्रवासाचा बेत आखून तीन महिन्यापूर्वी आरक्षणाचे तिकीट खरेदी करतात. परंतु काही प्रवाशांना ऐनवेळी प्रवास करण्याची वेळ येते. अशावेळी ते जनरल कोचचे तिकीट खरेदी करतात. जनरल कोचमध्ये असलेली खचाखच गर्दी पाहून ते स्लिपरक्लासमध्ये चढतात. रेल्वेतर्फे वेळोवेळी तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येते. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राबविलेल्या अभियानात अशा अनियमित तिकीटधारक आणि पार्सलची नोंद न करणाऱ्या १.२० कोटी प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल केला. फक्त आॅगस्ट महिन्यात सामानाची नोंद न करता प्रवास करणाºया ४९८८ प्रवाशांकडून ४.३१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते आॅगस्टदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने माल वाहतुकीद्वारे १ कोटी १६ लाख रुपये उत्पन्न मिळविले. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र आणि वाणिज्य विभागाच्या कर्मचाºयांनी पार पाडली. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य दराचे तिकीट घेऊन संबंधित कोचमधून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.मासिक तिकीटधारकही आरक्षित डब्यातमासिक तिकीटधारक अनेकदा स्लिपरक्लास, एसी कोचमध्ये प्रवास करतात. अशा वेळी संबंधित कोचमधील प्रवाशांना त्याचा त्रास होतो. रेल्वेतर्फे अनेकदा अशा मासिक तिकीटधारक प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे मासिक तिकीटधारकांनी केवळ जनरल कोचने प्रवास करण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी