शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात सुरू होणार ‘ट्रामा

By admin | Updated: September 19, 2015 04:02 IST

अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम मुदतीत पूर्ण झाले.

मेडिकल : संरक्षण भिंत व बाह्य विद्युतीकरणाला प्रशासकीय मंजुरी नागपूर : अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम मुदतीत पूर्ण झाले. परंतु संरक्षण भिंत आणि बाह्यभागातील विद्युतकरणाअभावी या सेंटरचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकल प्रशासनाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया थांबली होती. मात्र नुकतेच संरक्षण ंिभंतीसाठी १ कोटी २६ लाख तर विद्युतीकरणासाठी १८ कोटी ४० लाखाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने येत्या सहा महिन्यात ट्रामा केअर सेंटर रुग्णसेवेत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे, शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमुख्य वास्तुविद्यातज्ज्ञ अनिता खेरडे यांनी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना इतर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.रस्ता अपघातातील जखमींसोबतच, हृदयरोग आजाराच्या गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. या उद्देशाने मेडिकलने ६ हजार ८८० चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाची योजना तयार केली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटी रुपयांमधून या सेंटरसाठी ११.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु प्रस्तावित जागेवर बाबुंवनातील तब्बल १८५ झाडे अडसर ठरली. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने १६ आॅगस्ट २०१२ रोजी बांधकाम सुरू झाले. १८ महिन्याच्या मुदतीत म्हणजे मार्च महिन्यात बांधकाम पूर्ण झाले. मात्र, या दरम्यान तत्कालीन अधिष्ठात्यांनी प्रवेशद्वार, संरक्षण ंिभंत आणि बाह्य विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या निधीला प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरवाच केला नाही. यामुळे काम थंडबसत्यात पडले होते. धक्कादायक म्हणजे, सुरुवातीला विद्युतीकरणासाठी ४ कोटी १० लाखांचा प्रस्ताव भाववाढीमुळे तो १८ कोटी ४० लाखांवर गेला आहे. सुधारित प्रस्तावावर वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. यामुळे येत्या काही दिवसांत नियमानुसार विविध प्रक्रिया पार पडल्यानंतर संरक्षण ंिभतींच्या आणि विद्युतीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्य वास्तुविद्यातज्ज्ञ अनिता खेरडे यांच्या पाहणीच्यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)तीन महिन्यात संरक्षण भिंतीचे बांधकामसंरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी १ कोटी २६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत नकाशे, ई-निवादा सारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. साधारण तीन महिन्यात संरक्षण ंिभंतीचे बांधकाम होईल. विशेष म्हणजे, सेंटरच्या बाह्य विद्युतीकरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नव्हती. यात इतर विद्युत व्यवस्थेसोबतच ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनचे काम होते. हे काम पूर्ण झाल्यावरच हस्तांतरण करण्याचा नियम आहे. नुकताच या कामाला लागणाऱ्याा १८ कोटी ४० लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आहे.- सुषमा साखरवाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग‘सुपर’मध्ये प्रतीक्षालय व सुलभ शौचालयशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांच्या नातेवार्इंकांसाठी प्रतीक्षालय व सुलभ शौचालय नाही. यातील प्रतीक्षालयाच्या बांधकामाची जबाबदारी ‘रोटरी क्लब आॅफ ईशान्य’ या संस्थेने उचलली आहे. या दोन्ही जागेच्या बांधकामाची पाहणीही यावेळी उपमुख्य वास्तुविद्यातज्ज्ञ अनिता खेरडे यांनी केली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या डाव्या भागातील रिकाम्या जागेवर बांधकामाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. या भेटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार उपस्थित होते.