शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपूरच्या धर्तीवर लातूरमध्ये ट्रॉमा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:18 IST

नागपुरातच मेडिकलचे ‘लेव्हल-१’ ट्रॉमा केअर सेंटर आहे. या सेंटरचे बांधकाम व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू उद्या बुधवारी भेट देणार आहे.

ठळक मुद्देलातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोयी मिळाव्यात यासाठी मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटर जखमींसाठी वरदान ठरत आहे. राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ नागपुरातच मेडिकलचे ‘लेव्हल-१’ ट्रॉमा केअर सेंटर आहे. या सेंटरचे बांधकाम व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू उद्या बुधवारी भेट देणार आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित असल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.भारतात रस्ता अपघातातील मृत्यूची संख्या ही कुठल्याही आजाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. म्हणूनच अपघातातील जखमींना पहिल्या तातडीने वैद्यकीय सेवा मिळून त्यांना जीवनदान मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या तीन वर्षांत ‘न्यूरोसर्जरी’, अस्थिव्यंगोपचार, सामान्य शल्यचिकित्सा, दंत शल्यचिकित्सा व ‘प्लास्टिक सर्जरी’चे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या एकाही रुग्णांकडून शुल्क आकारले जात नाही. शासनाकडून वर्षाल जे ८ कोटी रुपये अनुदान दिले जाते त्यातून त्यांचा उपचाराचा खर्च भागविला जातो. या खर्चाच्या तुलनेत २०१७-१८मध्ये समाजाचे ४३ कोटी रुपये वाचविण्यात आले आहे. मेडिकलने सादर केलेल्या ‘वार्षिक आर्थिक निर्देशक’ातून हे वास्तव समोर आले आहे. यामुळे एक ‘आदर्श’ म्हणून मेडिकलचे ट्रॉमा केअर सेंटरकडे पाहिले जात आहे.मेडिकलच्या ट्रॉमाची माहिती लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आ. धीरज देशमुख यांनाही आहे. त्यांच्या क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित आहे. याला शासनाची मंजुरीही मिळाली आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी पाहणी केली होती. बांधकाम सुरू करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूरला नागपूर ट्रॉमाचा अभ्यास करण्याचे त्यांनी सूचना केली आहे. त्यानुसार उद्या बुधवारी डॉक्टर, बांधकाम विभागाची एक चमू भेट देणार आहे. तसे पत्र कार्यालयाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना पाठविले आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल यांच्याकडे पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

गेल्या वर्षी ४१६१ रुग्णांवर उपचारतळमजल्यासह तीन मजल्याच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ९० खाटा आणि ३७ व्हेंटिलेटर आहे. चार शस्त्रक्रिया गृह, दोन अतिदक्षता विभाग आहे. प्राप्त माहिनुसार गेल्या वर्षात ४१६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर विविध १२१८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयlaturलातूर