सेवकराम भोलूसिंग मंडलोई (वय ३४) असे मृताचे नाव आहे. तो पारडीतील जीपीसीएल कंपनीच्या जीजे १०- ७४९१ क्रमांकाच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. रविवारी पहाटे वाहनात सिमेंटचे मिक्स्चर भरण्यासाठी त्याने गाडी लावली आणि माल भरला की नाही ते बघण्यासाठी तो मशीनजवळ गेला. तेथे डोकावून पाहात असताना त्याची मान मशीनमध्ये अडकली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे कंपनीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
आजूबाजूच्या कामगारांनी त्याला तेथून मेयो इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी सेवकरामला मृत घोषित केले. अक्षदीप अजंता लोंदवडे (वय २०) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
तरुणाचा संशयास्पद मृत्यू
नागपूर : ताजबाग ताैफिकनगरात राहणारा राजा ऊर्फ शेख रेहान शेख अमान (वय २५) याचा संशयास्पद मृत्यू झाला.
तहसीलमधील गांधीबागच्या फुटपाथवर शनिवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास तो बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याला उपचारांसाठी मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राजाचा मृत्यूच्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा मृत्यू कोरोनाने झाला की काय, अशीही शंका घेतली जात आहे. तहसील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
---