शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका; आरटीओतील गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 22:38 IST

Nagpur News उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका परिवहन खात्या(आरटीओ)कडून ठेवण्यात आला आहे. परिणामी चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : एका ठिकाणी कार्यरत असताना दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगून शासनाकडून लाभाचे पद पदरात पाडून घेण्याची बनवाबनवी उघड झाली आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका परिवहन खात्या(आरटीओ)कडून ठेवण्यात आला आहे. परिणामी चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

चव्हाण यांनी २२. ११. २०२२ ला शासनाला एक विनंती अर्ज केला होता. या अर्जात त्यांनी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदिया येथे कार्यरत असून, नागपूर विभागात ते सर्वात वरिष्ठ तसेच अनुभवी अधिकारी असल्याचे नमूद केले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) तसेच नागपूर (शहर) येथील अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याची विनंती केली होती. त्याचमुळे शासनाकडून अर्थात परिवहन खात्याकडून चव्हाण यांना नागपुरातील पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

दरम्यान, चव्हाण यांनी पदभार घेतल्यानंतर नागपूर आरटीओत सरळ दोन गट पडले आणि खाबुगिरीच्या मुद्द्यावरून एक दुसऱ्यावर दोन्ही गटाकडून कुरघोड्या सुरू झाल्या. कमाईच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी नंतर खोट्या तक्रारीचाही सपाटा लागला. हे सुरू असताना आरटीओच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम टाऊनमध्ये येऊन बदल्यांचा बाजार मांडण्याची हिम्मत दाखविली. त्याचा लोकमतने पर्दाफाश करून राज्यभर खळबळ उडवून दिली. या वृत्त मालिकेची शासनाने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरटीओच्या बदल्यात होणारा कोट्यवधींचा गैरव्यवहार संपविण्यासाठी या प्रकरणाची चाैकशी करण्यासोबतच बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे आदेश दिले. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी बदल्यांच्या बाजारातील गैरप्रकाराची चाैकशी करण्यासाठी एसआयटीकडून चाैकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. हे सर्व सुरू असतानाच आरटीओतील अनेक गैरप्रकारांची चाैकशी सुरू झाली. चव्हाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली असताना त्यांनी शासनाला आपण गोंदिया येथे कार्यरत असल्याचे सांगितल्याचे, अर्थात चव्हाण यांनी शासनाची दिशाभूल केल्याचेही उघड झाले. त्यामुळे चव्हाण यांच्यावर ठपका ठेवून त्यांना या प्रकरणात परिवहन आयुक्तालयातून सोमवारी, २७ मार्चला पत्रवजा नोटीस जारी करण्यात आली.

तीन दिवसांचा अवधी

चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्यामुळे चव्हाण यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्न या नोटीसमध्ये अप्पर परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केला आहे. या संबंधाचा खुलासा तीन दिवसांत सादर करण्याचेही निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या घडामोडीची माहिती परिवहन खात्यातील वरिष्ठांसोबत गृहविभागालाही देण्यात आली आहे. या संबंधाने परिवहन अधिकारी चव्हाण यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

----

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस