शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट परवान्याने बेहडा जातीच्या लाकडांची वाहतूक, आरोपीस अटक

By दयानंद पाईकराव | Updated: March 24, 2023 20:53 IST

बनावट परवान्याच्या आधारे बेहडा जातीच्या लाकडाची वाहतूक करणाºया आरोपीला वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले

नागपूर :

बनावट परवान्याच्या आधारे बेहडा जातीच्या लाकडाची वाहतूक करणाºया आरोपीला वन विभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने आरोपीला २७ मार्च पर्यंत वन कोठडी दिली आहे.

सेमीनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कापसी परिसरात बेहडा जातीच्या लाकडांची इतर जिल्ह्यातून बनावट वाहतूक परवान्याद्वारे वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा , सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कँपा)  सुरेंद्र काळे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी २३ मार्चला भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सारीका वैरागडे आणि वनविभागाच्या पथकाने सापळा रचून एका वाहनाला थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्ये बेहडा या प्रजातीची  लाकडे असल्याचे आढळून आले.

सदर लाकडाबाबत वाहनचालकाने दाखविलेला परवाना जळगाव वन विभागाने जारी केलेला असल्याचे आढळले. वन विभागाच्या पथकाने जळगाव वनविभागीतल संबंधीत अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी हा परवाना जारी केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाºयांनी ट्र्क क्रमांक एम. एच. २८, बी. आर-७७८८ आणि ट्रकचालकास ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास २७ मार्चपर्यंत वन कोठडी दिली. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ.  भरत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे, वनपाल कुरेशी, वनपाल ए. के. गडे, ओ.बी. चौरागडे, एस. एल. पांडे, एन. एल. वाघ, वनरक्षक सचिन राघोर्ते, राठोड वनरक्षक, ए. एन. तिडके,   एस. जि. नेवारे आदींनी केली.