शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाने उडवली कारागृह प्रशासनात खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:14 IST

उच्च पातळीवरून चौकशी; उलट-सुलट चर्चेला उधाण

नागपूर : वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यासह मध्यवर्ती कारागृहातील पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगार अशा नऊ जणांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार करून एका तृतीयपंथीयाने राज्य कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण केली आहे. गुरुवारी उशिरा रात्री या प्रकरणात धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर शुक्रवारी लोकमतने हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यामुळे संपूर्ण राज्याच्या कारागृह प्रशासनात भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकरणाची चोहोबाजूने चौकशी केली जात आहे. चमचम गजभिये या तृतीयपंथीयाच्या हत्येच्या आरोपात जून २०१९ पासून तृतीयपंथी उत्तम बाबा सेनापती उर्फ सपन कारागृहात बंद आहे. त्याने न्यायालयाला पत्र लिहून मध्यवर्ती कारागृहाचे ५ तुरुंगाधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन गुन्हेगार असे ९ जण दीड वर्षांपासून लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने उत्तम बाबाला धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी नेण्याचे आदेश येथील कारागृह अधीक्षकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर, उत्तम बाबाने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी एक वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यासह पाच तुरुंगाधिकारी, दोन तुरुंग कर्मचारी आणि दोन गुन्हेगार अशा नऊ जणांविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. लोकमतने शुक्रवारच्या अंकात हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. पुणे, मुंबई येथून स्थानिक कारागृह प्रशासनाकडे या संबंधाने दिवसभर विचारणा करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आज रात्री संबंधित वरिष्ठांकडे पाठविला. दरम्यान, ज्या तुरुंगाधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आले,  ते सर्वच्या सर्व आज कारागृहात कर्तव्यावर आलेच नाही. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली.असे कसे शक्य आहे?कारागृहात दोन हजार पेक्षा जास्त कैदी असताना हा घृणास्पद प्रकार अधिकारी कसा करू शकतात, असाही प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, ते जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तम बाबाची व्यवस्था वेगळ्या खोलीत असल्याचे सांगून जास्त बोलण्याचे टाळले. मोठा पोलिस बंदोबस्त लोकमत या खळबळजनक प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची डिजिटल क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. या पार्श्वभूमीवर, तृतीयपंथी,  किन्नरांचा मोठा जमाव कारागृह समोरच्या परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यापूर्वी त्यांनी घातलेला हैदोस लक्षात घेऊन दुपारपासून मोठा पोलीस बंदोबस्त कारागृहासमोर लावण्यात आला. मात्र, सायंकाळपर्यंत कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.