शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रामझुल्यासाठी अ‍ॅफकॉन्सला जागा हस्तांतरित करा

By admin | Updated: September 12, 2015 03:02 IST

रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १५ दिवसांत जागा हस्तांतरित करावी व कंपनीने ....

हायकोर्टाचे रेल्वेला आदेश : ‘एमएसआरडीसी’कडे रेल्वेचे ११ कोटी थकीतनागपूर : रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १५ दिवसांत जागा हस्तांतरित करावी व कंपनीने त्यानंतर सात दिवसांत कामाला सुरुवात करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिलेत. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रामझुल्याची देखभाल करणे व बांधकामावर देखरेख ठेवणे यासाठी मध्य रेल्वेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)कडून ११ कोटी ६६ लाख २६ हजार रुपये घेणे आहे. ही रक्कम कधीपर्यंत मध्य रेल्वेला देता अशी विचारणाही न्यायालयाने महामंडळास केली असून यावर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. करारातील एका तरतुदीनुसार आवश्यक शुल्क जमा केल्याशिवाय रेल्वेच्या जमिनीवर कोणतेही काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येत नाही. महामंडळाने रेल्वेचे शुल्क थकीत ठेवल्यामुळे रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी जुना उड्डाण पूल तोडणे आवश्यक आहे. अ‍ॅफकॉन्सतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी तर, मध्य रेल्वेतर्फे अ‍ॅड. एन. पी लांबट यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)असे आहे प्रकरणशासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचेच काम पूर्ण करण्यासाठी २०१४ साल उजाडले. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. रामझुल्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्याकरिता नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सने जनहित याचिका दाखल केली होती. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण प्रकल्प ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. न्यायालयाने हे बयान स्वीकारून ६ जुलै २०१२ रोजी जनहित याचिका निकाली काढली होती. यानंतर आश्वासन पाळण्यात अपयश आल्यामुळे कंपनीने मुदतवाढीसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.