अभिजित वंजारी : महापौरांना घेराव नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील भांडेवाडी येथे कामठी येथील कत्तलखाना स्थानांतरित करण्यासंदर्भात नगररचना विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनाही आल्या होत्या. एकीकडे भांडेवाडीच्या डम्पिंग यार्डमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच कत्तलखान्याची भर पडणार आहे. येथे जनावरे राहतात का, असा सवाल अॅड. अभिजित वंजारी यांनी महापौरांना केला. येथील डम्पिंग यार्ड व अवैध कत्तलखाना स्थानांतरित करावा, या मागणीसाठी महापौर प्रवीण दटके यांना अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. याप्रसंगी महापौरांनी आश्वासन दिले की, डम्पिंग यार्ड व कत्तलखाना २०१९ मध्ये स्थानांतरित करण्यात येईल. आठ दिवसांच्या आत महापौर, मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी, भांडेवाडी नागरिक कृती समितीसोबत समस्या निवारण्यासाठी दौरा करतील. याप्रसंगी तानाजी वनवे, कुमुदिनी कैकाडे, मनोज साबळे, राजू व्यास, रत्नाकर जयपूरकर, नाना झोडे, परमेश्वर राऊत, निर्मला बोरकर, ललिता शाहू, मीनाक्षी ठाकरे, अंगद हिरोंदे, शुभम मोटघरे, श्रीकांत कैकाडे, राजेश पौनीकर, मनोज नौकरकर, शेख मुजीब वारसी, इर्शाद अली, कैलास वानखेडे, सूर्यकांता नायडू, मनीष वानखेडे, चंद्रकांत हिंगे, विजय वनवे, कमल जोशी, मूलचंद निर्मलकर, शेख मुस्ताक शेख अय्याज, पप्पू पटेल, मुकेश गजभिये, प्रवीण बेलेकर, रुपेश चौरसिया, गुणवंत झाडे, राजू कुथे, राजू राऊत, धनराज अतकरी, पुष्पा सोनवणे, नूरजहाँ शेख, शकुंतला धार्मिक, चंदा राऊत, राजकुमार फुलझेले, प्रशांत पाटील, ओंकार देऊळकर, नितीन रामटेके, राजेश डेंगे, गोपाल शेंडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भांडेवाडीचा डम्पिंग यार्ड व कत्तलखाना स्थानांतरित करा
By admin | Updated: June 18, 2016 02:24 IST