लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाचकांच्या घरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी उनपावसाची तमा न बाळगणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम लोकमत समूह निरंतर करीत आहे. या उपक्रमांतर्गत लोकमत समूहाने नागपुरातील जवळपास १५०० पेपर विक्रेत्यांची एकत्रित हॉकर्स समूह अपघात विमा पॉलिसी सब-एजंटांना एका छोटेखानी कार्यक्रमात हस्तांतरित केली.पॉलिसीचे हस्तांतरण नागपूर शहरातील लोकमत, लोकमत समाचार आणि लोकमत टाइम्सच्या सब-एजंटांच्या उपस्थितीत मंगळवारी लोकमत भवनात करण्यात आले. विमा पॉलिसीचे वितरण लोकमत समूहातर्फे दरवर्षी करण्यात येते. आतापर्यंत अपघातात मृत्यू पावलेल्या दोन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा प्रदान केला आहे. लोकमत समूहातर्फे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत विविध उपक्रमांचे आयोजन नेहमीच करण्यात येते.या प्रसंगी प्रदीप भगत, वसंत सहारे, विशाल मोहलिया, गजानन शिंगणे, विक्रांत चिंचखेडे, अश्विन अंबादे, दीपक गुप्ता, हरीश ढोक, प्रवीण गुंड, ताराचंद निनावे, आशिष निनावे, पुरुषोत्तम मौंदेकर, राकेश मासुरकर, संजय चवणे, पीतांबर अहिरकर, प्रशांत काळने, रितेश अंबडवार, चेतन ढोरे, भोजराज भोयर, अनिल कढव यांच्यासह लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, महाव्यवस्थापक (वितरण) संतोष चिपडा, वरिष्ठ विपणन व्यवस्थापक (वितरण) मुश्ताक शेख, उपव्यवस्थापक शिरीष मोरस्कर, विलास तिजारे, इम्रान हुसेन आणि अमित खोडके उपस्थित होते.
‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना अपघात विमा पॉलिसीचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:35 IST
वाचकांच्या घरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्यासाठी उनपावसाची तमा न बाळगणाºया वृत्तपत्र विक्रेत्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम लोकमत समूह निरंतर करीत आहे.
‘लोकमत’तर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना अपघात विमा पॉलिसीचे हस्तांतरण
ठळक मुद्दे जवळपास १५०० जणांना पॉलिसी प्रदान : सब-एजंट उपस्थित