शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर अल्पवयीन प्रेमी युगुलास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

नागपूर : घरी कोणालाच न सांगता जयपूरला पळून जाणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगुलास रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी सायंकाळी ५ वाजता ...

नागपूर : घरी कोणालाच न सांगता जयपूरला पळून जाणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगुलास रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी सायंकाळी ५ वाजता पकडले. त्यांच्या आईवडिलांना सूचना देऊन त्यांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

विशाल (१७) आणि सुनिता (१५) (बदललेली नावे) हे दोघेही छत्तीसगडमधील भिलाई येथे राहतात. विशाल पॉलिटेक्निकला शिकत असून सुनिता नवव्या वर्गात शिकते. दोघेही एकाच गल्लीत राहत असल्यामुळे त्यांचे आपसात सूत जुळले. आईवडिलांचा आपल्या प्रेमाला विरोध होईल असा विचार करुन दोघांनीही घर सोडायचे ठरवले. ते रेल्वेगाडीने नागपूरला आले. सायंकाळी ५ वाजता ते प्लॅटफार्म क्रमांक एकवरील जनरल वेटिंग हॉलजवळ संशयास्पद स्थितीत बसून होते. आरपीएफ जवानाच्या त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्याने या दोघांची विचारपुस केली. त्यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी घरून पळून आलो असून जयपूरला जाणार होतो, अशी माहिती दिली. लगेच रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना बोलाविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना ते सापडल्याची माहिती देऊन त्यांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले. वेळीच ते आरपीएफला आढळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ते असामाजिक तत्वांच्या हाती लागले असते तर त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले असते.

.............