शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय आवारात त्रिकोणी संबंधातून हाणामारी

By admin | Updated: October 4, 2015 03:27 IST

एका त्रिकोणी संबंधातून चक्क न्यायालयाच्या आवारात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

नागपूर : एका त्रिकोणी संबंधातून चक्क न्यायालयाच्या आवारात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. न्यायालय सुरक्षा पोलिसांनी वेळीच या दोघांना पकडून सदर पोलिसांच्या स्वाधीन केल्याने संभाव्य मोठी घटनाही टळली. प्रकरण असे की, जुना कामठी मार्ग गुलशननगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय मदनचा आपल्या पत्नीसोबत गेल्या काही दिवसांपासून कलह सुरू आहे. कलहाचे कारण म्हणजे खापरखेडा भागात राहणाऱ्या धर्मेंद्र (२८) हा गेल्या काही दिवसांपासून मदनच्या पत्नीसोबत मोबाईलवर सतत संपर्क करीत आहे. तिला एसएमएस करतो. ही बाब मदनच्या लक्षात येताच त्याने पत्नीला हटकले धर्मेंद्रबाबत विचारणा केली असता तिने धर्मेंद्र हा आपल्या आत्याचा मुलगा सांगितले होते. त्यामुळे मदन आणखीच संतापला होता. त्याने लागलीच आपल्या घरी नातेवाईकांची पंचायत भरवली होती. मदनच्या पत्नीने धर्मेंद्रसोबत काहीही संबंध नसल्याचे पंचायतीत सांगितले नव्हते. ही बाब मदनने पत्नीला कोर्टात लिहून मागितली असता शनिवारी पती-पत्नी न्यायालयाच्या आवारात शपथपत्र लिहिण्यासाठी आले होते. त्याच वेळी धर्मेंद्रही न्यायालयात आला होता. तो मदनच्या नजरेस पडताच मदन याने त्याच्यावर अक्षरश: झडप घेतली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. धर्मेंद्रनेही त्याचा चांगलाच प्रतिकार केला. दोघांमध्ये जबरदस्त हाणामारी होताना पाहून न्यायालय सुरक्षा चौकीतील पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव, हेड कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, महेंद्रसिंग ठाकूर, अविनाश चव्हाण आणि विलास वाडेकर यांनी दोघांनाही पकडले. त्यावेळी मदनची पत्नीही होती. तिच्या सांगण्यावरून धर्मेंद्र हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, असे निष्पन्न झाले. तूर्त सुरक्षा पोलिसांनी या दोघांना सदर पोलिसांच्या स्वाधीन केले.(प्रतिनिधी)