शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

By admin | Updated: November 30, 2015 02:39 IST

मालवाहतूक चालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण होतो.

अपघात कमी करण्यासाठी आरटीओचा स्तुत्य उपक्रम : एक लाख वाहन चालकांचे केले प्रबोधननागपूर : मालवाहतूक चालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण होतो. यातच प्रवास मोठा असल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. याला लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने, ‘जनआक्रोश’ या सामाजिक संघटनेच्या सहकार्याने मालवाहतूक चालकांसाठी प्रबोधन वर्ग सुरू केले आहेत. आतापर्यंत सुमारे एक लाख चालकांचे प्रबोधन करण्यात त्यांना यश आले आहे.गेल्या काही वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरी, सहापदरी झाले आहेत. ग्रामीण भागातील रस्तेही चांगले झाले. पण अपघातांची संख्या मात्र कमी झाली नाही. अपघातांचे वाढते प्रमाण ही राष्ट्रीय समस्या झाली आहे. विशेषत: महार्गावर अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी आरटीओ, शहरने २०१२ पासून एक अभियान हाती घेतले. यात मालवाहतूक चालकाला परवाना (ट्रान्सपोर्ट लायसन्स) देण्यापूर्वी किंवा त्याचे नुतनीकरण करण्यापूर्वी त्याचे दोन तास प्रबोधन केले जाते. मोटार वाहन निरीक्षक आणि जनआक्रोशचे सदस्य चित्रफितीच्या मदतीन हे प्रबोधनाचे वर्ग घेतात. यात चालकाच्या होत असलेल्या चुका त्यामुळे घडत असलेला अपघात यावर मार्गदर्शन करतात. अपघात झाल्यास काय करावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती देतात. चौपदरी रस्त्यावर जड वाहन असल्यास वाहनचालकाने डाव्या बाजूच्या लाईनमधूनच वाहन चालविणे, या सारख्या नवीन नियमांवर चर्चा आणि त्यातून मार्गदर्शन करतात. आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी हे वर्ग घेतले जातात. या वर्गात उपस्थित असलेल्या चालकांनाच परवान्याची पुढील प्रक्रिया पूर्ण होते. राज्यात बोटावर मोजण्या इतक्या आरटीओ कार्यालयात ही मोहीम सुरू आहे. त्यात शहर आरटीओ कार्यालय आघाडीवर आहे. आतापर्यंत एक लाख मालवाहतूक चालकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेला हा उपक्रम सध्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांच्या मार्गदर्शनातही यशस्वीरीत्या सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार आणि जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांच्या नेतृत्वात हे वर्ग सुरू आहेत. (प्रतिनिधी)चालकांसाठी प्रबोधन वर्ग महत्त्वाचाअनेक मालवाहतूक चालक जुन्याच नियमांना घेऊन वाहतूक करीत असतात. यामुळे अपघात संभावतो. पूर्वी आणि आत्ताच्या रस्त्यांमध्ये बराच बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने नवनवीन नियमही तयार होत आहेत. याची माहिती होण्यासाठी आणि एकच एक काम करीत असल्याने त्यांच्यामध्ये आलेला उतावीळपणा त्यांच्याच नजरेत आणून देण्यासाठी या पद्धतीचे प्रबोधन वर्ग महत्त्वाचे ठरत आहे. -विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)