शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसावर गुंडांचा हल्ला

By admin | Updated: February 11, 2017 02:18 IST

सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच एका गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली.

सक्करदरा ठाण्यासमोरची घटना : आरोपींना अटक नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच एका गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गुन्हेगाराला रंगेहात पकडले. सागर ऊर्फ गुलाम नामदेव जाधव, सुशील गुप्ता, गोलू गौर, शुभम यादव आणि राहुल नायडू अशी आरोपीची नावे आहेत. वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी शुक्रवारी रात्री ७.१५ वाजता सक्करदरा पोलीस ठाण्याजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला पीक अप वाहनात ठेवत होते. त्यावेळी आरोपी बारमध्ये दारू पित होते. पोलीस वाहन उचलत असल्याचे माहीत होताच आरोपी व इतर ग्राहक बाहेर आले. त्यांना वाहन उचलले जात असल्याचे दिसले. आरोपी धावत गेले व वाहनात बसलेले पोलीस कर्मचारी किशोर इटनकर यांच्याशी वाद घालू लागले. इटनकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी त्यांना धक्काबुक्की करू लागले. त्यांनी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे पाहणाऱ्यांची गर्दी झाली. पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडत असल्याने ठाणेदार नेर्लेकर लगेच घटनास्थळी आले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेचे निरीक्षक एस.एस. सोनटक्के सुद्धा घटनास्थळी पोहोचले. गुलाम जाधव हा तडीपार गुन्हेगार आहे. गुलाम आणि सुशीलच्या विरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचे साथीदार सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. (प्रतिनिधी)