शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी स्वत:हून काढले अतिक्रमण

By admin | Updated: March 20, 2017 02:04 IST

सीताबर्डीतील मोदी नं. २ मध्ये सातत्याने वाहतुकीची समस्या भेडसावत होती. व्यापाऱ्यांनी आपल्या सोईनुसार रस्त्यावर अतिक्रमण केल्याने

मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांचा पुढाकार : वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाय नागपूर : सीताबर्डीतील मोदी नं. २ मध्ये सातत्याने वाहतुकीची समस्या भेडसावत होती. व्यापाऱ्यांनी आपल्या सोईनुसार रस्त्यावर अतिक्रमण केल्याने या गल्लीतून वाहतूक करणे अतिशय अवघड होते. येथून एखादे तीनचाकी वाहन जरी गेल्यास वाहतुकीचा खोळंबा होत होता. अतिक्रमणामुळे पायी चालणेसुद्धा कठीण झाले होते. दररोजची होणारी तुतुमैमै लक्षात घेता, मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांनी स्वत:च अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. आपल्या दुकानाची सीमा ठरवून घेत, वाहतुकीस रस्ता मोकळा केला. अतिक्रमण काढण्यास व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सीताबर्डीतील मोदी नं. २ ही व्यापारी गल्ली आहे. या गल्लीच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहे. व्यवसायाचा व्याप लक्षात घेता आपल्या सोईनुसार व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून रस्तासुद्धा व्यापून घेतला होता. त्यामुळे गल्ली अगदी निमुळती झाली होती. पायी चालणाऱ्यांनासुद्धा येथून सहज चालणे कठीण झाले होते. एखादे प्रवासी अथवा मालवाहतूक वाहन येथून गेल्यास, वाहतुकीचा जॅम लागून जात होता. येथे दररोज ही स्थिती बघायला मिळायची. त्याचा त्रास नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनासुद्धा होत होता. व्यापाऱ्यांची दररोज कुणासोबत तरी तुतुमैमै होत होती. शेवटी मोदी नं. २ च्या व्यापाऱ्यांनी स्वत: गल्लीतील वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. सर्व व्यापाऱ्यांनी सभा घेऊन आपापले अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले. प्रत्येकाने आपापल्या दुकानाची सीमा ठरवून पिवळे पट्टे मारले. व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने आज ही गल्ली अतिक्रमणमुक्त झाली आहे. या सभेला पुष्पक खापेकर, संजय मेश्कर, मंगेश डोमाळे, व्यंकटेश नायडू, पराग भेंडे, सुरेश राव, अजय पाटणे, प्रदीप मिश्रा, शंकर मुरारका, गोपाल चांडक, गोपु चौरसिया आदी व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)