शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटून तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : लाकडे आणण्यासाठी मजुरांना घेऊन वेगात जात असलेला ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. यात ट्रॅक्टरचालक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : लाकडे आणण्यासाठी मजुरांना घेऊन वेगात जात असलेला ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. यात ट्रॅक्टरचालक व दाेन मजूर अशा तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दाेन मजूर गंभीर जखमी झाले. सर्व जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलाेटी-बाेर्डकला मार्गावर शुक्रवारी (दि. २५) दुपारी घडली.

मृतांमध्ये ट्रॅक्टरचालक राजेश रामचंद्र मोटघरे (२५, रा. बेटाळा, ता. पवनी, जिल्हा भंडारा), श्रीकृष्ण दामोदर नागोसे (३०) व अमृत हगरू मेश्राम (५५) दाेघेही रा. सिरसाळा, ता. पवनी, जि. भंडारा या तिघांचा समावेश असून, संतोष कावळे (२१) व मोहित वरठी (१८) दाेघेही रा. रा. बेटाळा, ता. पवनी, जि. भंडारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे सर्व जण एमएच-३६/झेड-१९३७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने लाकडे आणण्यासाठी जात हाेते. दाेन मजूर चालकाजवळ तर दाेघे ट्राॅलीत बसले हाेते.

चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रॅक्टर सेलाेटी शिवारात उलटला. त्यात चालक व दाेघे ट्रॅक्टरच्या इंजिनखाली दबले गेले तर दाेघे फेकले गेले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दबलेल्या तिघांना बाहेर काढले. ताेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी दाेघांना उपचारासाठी तर तीन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. दाेन्ही जखमींवर प्रथमाेपचार करून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात भिवापूर पाेलीस करीत आहेत.

....

गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता

अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. तिन्ही मृतांच्या शरीरावर फारशा गंभीर जखमा नव्हत्या. मात्र, त्यांच्या नाकाताेंडात माती गेली हाेती. त्यामुळे त्या तिघांचाही मृत्यू गुदमरून झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. उत्तरीय तपासणी प्रक्रिया शनिवारी (दि. २६) सकाळी केली जाणार असल्याचे डाॅ. शांतीदास लुंगे यांनी सांगितले.