शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विषप्राशन, हृदयविकारावरील चाचणी बंद

By admin | Updated: July 10, 2017 01:41 IST

वैद्यकीयशास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे असते.

मेडिकल : तातडीच्या उपचारावरच प्रश्नचिन्हलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीयशास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे असते. म्हणूनच मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तिन्ही लॅब मिळून ६० वर डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अद्ययावत यंत्रसामूग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे असताना गेल्या दीड महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्याची चाचणी ‘सीपीके-एमबी’ तर विषप्राशन केलेल्या रुग्णाच्या शरीरातील विषाची तीव्रता माहीत करून घेणारी ‘कोलाईनइर्स्टस’ या दोन महत्त्वाच्या चाचण्या बंद पडल्या आहेत. परिणामी, मेडिकलमधील रुग्णाच्या तातडीच्या उपचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांच्या चाचण्यांची गुणवत्ता राखणे (क्वॉलिटी कंट्रोल), त्याची फेर पडताळणी (क्रॉस चेक) करणे व २४ तास सहायक प्राध्यापकांच्या देखरेखेखाली नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतला. यामुळे चाचण्यांमध्ये अहवालामध्ये सुसूत्रता आली आहे. रुग्णांचा त्रासही कमी झाला. परंतु अनेक महत्त्वाच्या चाचण्या रुग्णालयात होणे अचानक बंद होत असल्याने व महिनोन्महिने त्या बंदच राहत असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवर कसा होणार उपचारमेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागात हृदयविकाराचे दहावर गंभीर रुग्ण येतात. यातील तीन ते चार रुग्णांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असतो. याची तपासणी करण्यासाठी ‘सीपीके-एमबी’ ही महत्त्वपूर्ण चाचणी असते. परंतु दीड महिन्यांपासून ही चाचणी करणेच बंद आहे. रुग्णांना बाहेरून ही तपासणी करण्यास सांगितले जात आहे. या धावपळीत वेळ जात असल्याने तातडीचे उपचारापासून रुग्ण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे. या शिवाय तीन-चार दिवसांपूर्वी हृदयात दुखले असेल आणि आज उपचारासाठी आला असेल त्याची माहिती घेण्यााठी असलेली ‘ट्रोपोनीन -टी’ ही देखील चाचणीही बंद असल्याची माहिती आहे.विष घेतलेल्या रुग्णांतही उपचारात उशीरविष प्राशन केलेल्या रुग्णाच्या शरीरातील विषेची तीव्रता माहिती करून घेणारी ‘कोलाईनइर्स्टस’ ही चाचणी गेल्या महिन्यापासून बंद आहे. बाहेर ही चाचणी महागडी आहे. यामुळे काही गरीब रुग्णांचे नातेवाईक अडचणीत येतात, तर काहींवर पदरमोड करून या तपासण्या कराव्या लागतात.खासगीमधून तपासण्या कधी होणार बंद?एकीकडे शासन मेडिकलच्या अद्यावत यंत्रसामग्रीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते, मात्र प्रशासन त्या यंत्रावरील चाचण्या सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, याचे हे बोलके चित्र आहे. या उलट मेडिकल चौकातील केवळ दहा बाय पंधराच्या खोलीतील एका खासगी ‘लॅब’मध्ये एक तंत्रज्ञ मेडिकलमध्ये न होणाऱ्या सर्व चाचण्या करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.