शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पर्यटन दिन विशेष; नागपूर ठरणार बौद्ध पर्यटनाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 10:41 IST

जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे.

ठळक मुद्देदीक्षाभूमीला जोडून प्रेरणादायी स्थळांचे सर्कल जगभरातील पर्यटकांना अभ्यासाची संधी

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगाचा मध्यबिंदू आणि सर्वाधिक वाघांची संख्या असल्याने भारताचे टाईगर कॅपिटल म्हणून ओळख असलेले नागपूर जगभरातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे शहर ठरत आहे. यासोबतच एक नवी ओळख उपराजधानीला मिळत आहे. समतेची प्रेरणाभूमी म्हणून जगातल्या बौद्ध अनुयायांचे आदरस्थान असलेल्या दीक्षाभूमीच्या असण्याने प्रकाशझोतात असलेली संत्रानगरीच्या आसपास अनेक महत्त्वाची प्रेरक स्थळे अस्तित्वात आहेत. त्यामुळे हे संपूर्ण सर्कल दीक्षाभूमीशी जोडले तर हे क्षेत्र बौद्ध पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरू शकते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागलोकांची भूमी म्हणून या क्षेत्राचा उल्लेख केला होता व ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनासाठी त्यांनी नागपूरची निवड केली होती. त्यांच्या धम्मदीक्षेनंतर या भूमीला समतेची भूमी ही नवी ओळख प्राप्त झाली आहे. दरवर्षी धम्मदीक्षा सोहळ्याच्या वेळी लाखो बौद्ध अनुयायी जगाच्या कानाकोपऱ्यातून नागपूरला प्रेरणा घेण्यासाठी येत असतात. मात्र येथे येणाºया बहुतेक अनुयायांना नागपूरच्या आसपास असलेल्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्याची इच्छा होते. त्यापैकी कामठीतील ड्रॅगन पॅलेस, कळमेश्वर रोडवरील चिचोली आणि रामटेकमध्ये नागार्जुन टेकडीचा उल्लेख करावा लागेल. ड्रॅगन पॅलेसमध्ये मास ट्रेनिंग सेंटर, विपश्यना कें द्र निर्माण करण्यात आले आहे. चिचोली येथे डॉ. बाबासाहेब उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांचे सहकारी गोडबोले यांनी तयार केले आहे. शासनाने दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसला ‘अ’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे यातील दीक्षाभूमी, चिचोली व ड्रॅगन पॅलेसला बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट म्हणून विकसित करण्याची योजना शासनाने आखली आहे.याशिवाय आसपासच्या क्षेत्रात असलेली आणखी काही महत्त्वाची स्थळे भेट देण्याचे आणि अभ्यासाचे केंद्र ठरू पाहत आहेत. यामध्ये रामटेक येथील नागार्जुन टेकडी, कामठी रोडवरील नागलोक प्रशिक्षण केंद्र, भंडारा जिल्ह्याातील पवनीपासून दोन किमी अंतरावर असलेले सिंदपुरीचे स्तूप, चंद्रपूरच्या भद्रावतीजवळ उत्खननात सापडलेली विज्ज्यासन लेणी, वर्धा येथील धर्मानंद कोसंबी यांनी निर्माण केलेले स्तूप, चिमूरजवळचे भदंत ज्ञानज्योती यांचे विहार तसेच बोरधरण येथे असलेले चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग यांचे स्मारक आदींचा समावेश आहे. ह्यू-एन-त्संग याने आपल्या प्रवास वर्णनात नागपूर, चंद्रपूर, रामटेक व भद्रावतीचा उल्लेख केला असून या भागात हजारो बौद्ध भिक्खू वास करीत होते, असे वर्णन केले आहे. त्यामुळे परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला असून अभ्यासकांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

रामटेकची नागार्जुन टेकडीभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या पुढाकाराने विकसित होत असलेल्या रामटेकच्या नागार्जुन टेकडी परिसरात उत्खननात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. आचार्य नागार्जुन हे जगात रसायनतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते व त्यांचा वास याच परिसरात होता. त्यांनी या भागात मोठी प्रयोगशाळा निर्माण केली होती ज्यामध्ये ते रसायने व आयुर्वेदावर संशोधन करीत होते. याशिवाय हजारो भिक्खूंचे निवास येथे होते. उत्खननात ही प्रयोगशाळा व भिक्खूंचे निवास असलेले बौद्ध अवशेष सापडले आहेत. हा भाग पितखोरे म्हणून प्रसिद्ध होता व हयू-एन-त्संग यानेही या क्षेत्राचा उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात केला आहे.

भद्रावतीला उत्खननात सापडली लेणीचंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावतीजवळ तीन किलोमीटर अंतरावर नुकत्याच झालेल्या उत्खननात विज्ज्यासन लेणी सापडल्या आहेत. या लेण्यांबद्दलही हयू-एन-त्संग यांच्या प्रवास वर्णनात उल्लेख सापडतो. पुरातन काळात हे बौद्ध प्रशिक्षण केंद्र होते.

शासनाने प्रस्तावित केलेल्या बौद्ध टुरिस्ट सर्किट योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. नुकतीच या प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. चिचोली येथील संग्रहालयाचे काम प्रगतीवर आहे. याशिवाय दीक्षाभूमी येथे काही कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे हे सर्किट लवकरच मूर्तरूपात साकार होईल, अशी आशा आहे.- अश्विन मुद््गल, प्रभारी सभापती, नागपूर सुधार प्रन्यास

टॅग्स :tourismपर्यटन