शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकूण पदके २३७, तंदुरुस्त शरीर आणि अवघे पाऊणशे वयोमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 10:37 IST

 नागपुरातील प्रभाकर साठे वय वर्षे ७५. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे.

ठळक मुद्देपोहण्याने दिले शरीराला बळ एकदाही पाहिले नाही दवाखान्याचे तोंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील  प्रभाकर साठे वय वर्षे ७५ यांना बघितल्यावर वाटणार नाही, या वयातही ही व्यक्ती एवढी फिट कशी. आॅफिसर्स क्लबच्या जलतरण केंद्रावर नियमित सकाळी साठेकाका तरुणालाही लाजवेल असा सूर मारतात. कधी तास, कधी दोन तास अगदी लहान मुलांसारखे पाण्यात खेळतात. त्यांच्या फिटनेसचे गुपित विचारल्यावर ते म्हणतात, पोहण्याच्या सातत्यामुळे माझे मन, बुद्धी आणि शरीर अगदी निरोगी आहे. त्यामुळे पाऊणशे वयोमानातही मी दवाखान्याचे तोंड बघितले नाही.निव्वळ आनंद म्हणूनच नाही, तर साठे यांनी वयाची पंचाहत्तरी गाठताना अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी विश्व मास्टर्स जलतरण सूर स्पर्धा स्वीडन २०१०, रिमिनी - इटली २०१२, मॉन्ट्रियल- कॅनडा २०१४, कझान -रशिया २०१५, येथे सूर स्पर्धेत ५ पदके प्राप्त केली आहेत. आतापर्यंत त्यांनी १५० सुवर्ण, ५५ रौप्य व ३२ कांस्य अशी एकूण २३७ पदके प्राप्त केली आहेत.प्रभाकर साठे हे शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातून विभागीय ग्रंथपाल म्हणून २००३ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी ३५ वर्षे येथे सेवा दिली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी अंबाझरीच्या नाल्यात गुराख्यांच्या मुलांसोबत पोहणे शिकले. १९६५-६६ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट जलतरण व सूरपटूचा सन्मान प्राप्त केला. त्यांनी जिल्हा ते राष्ट्रीय जलतरण सूर स्पर्धा गाजविल्या.त्यांचे विशेष कौतुक म्हणून या वयातही त्यांनी दोन मुलांना अंबाझरी तलावात बुडता बुडता वाचविले. ३१ मे २०१६ रोजी अंबाझरी तलावात दोन मुले पाण्यात गटांगळ्या खात होती. प्रभाकर साठे यांना दिसताच, त्यांनी तत्काळ तलावात उडी घेतली आणि दोघांचेही प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले.शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोहण्यास कधी खंड पडू दिला नाही. यातच ते आपल्या जीवनाचा आनंद मानतात.

मी निरोगी असल्याचा अभिमान आहेनिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने आपले शरीर सांभाळणे महत्त्वाचे आहे. पोहण्यामुळे शरीर, मन, शांत व स्थिर राहून शरीराला लवचिकता प्राप्त होते. पोहण्यासारखा आनंद नाही, मग कितीही टेन्शन असेल तरी, तुम्ही जग विसरता, आनंद मिळतो. या वयातही मी निरोगी असल्याबद्दल मला अभिमान आहे.- प्रभाकर साठे,मास्टर्स जलतरणपटू

टॅग्स :Sportsक्रीडा